भोकर येथे बांधकाम कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..

भोकर येथे बांधकाम कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..
भोकर येथे माजी आमदार भानुदास मुरकुटे व करणदादा ससाने यांच्या मार्गदर्शनाखाली काल नोंदणीकृत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने व कामगार नेते गणेशभाऊ छल्लारे यांच्या सहकार्याने बांधकाम कामगारांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भोकर व परिसरातील अनेक बांधकाम कामगारांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरा मध्ये तज्ञ डाँक्टर यांचे वतीने सर्व शरीराचे चेकअप, रक्त लघवी तपासणी फ्री मध्ये कराण्यात आली याअशोकचे संचालक पुंजाहरी शिंदे, जेष्ठनेते आण्णासाहेब पाटील चौधरी , सोसायटीचे माजी चेअरमन सागर शिंदे, ग्राम. सदस्य राजेंद्र चौधरी, सोसायटीचे संचालक बाबासाहेब तागड गणेश छलारी ग्रामपंचायत व सेवा संस्थेचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आरोग्य शिबिर पार पडले. या शिबिरात 200 कामगार व त्यांच्या कुटुंबाने नोंदणी करून लाभ घेतला या शिबिरात बाबुलाल शेख ,संतोष भोगे,रविंद्र धामोरे,वैभव अमोलिक,सोमनाथ छल्लारे ,रविंद्र छल्लारे ,जितेंद्र छल्लारे ,कांता बेलदार,रखम दिवटे,कलिम शेख,बबन मांजरे,अशोक डुकरे,पल्लवी डुकरे,नवनाथ खंडागळे,भाऊसाहेब अमोलिक , नाथा डुकरे , किशोर डुकरे,नारायण अमोलिक,कांबळे मिस्तरी,व अनेक कामगारांनि आरोग्य तपासणी करून घेतली व या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरासाठी नगर येथुन डॉ. कृष्णा वायदंडे, डॉ. आरती घाडगे,तेजस रोडे, अक्षरा सातदिवे यांनी तपासणी करून गोळ्या औषधे देऊन चांगली सेवा दिली. या शिबिरासाठी गणेशभाऊ छल्लारे मित्र मंडळ भोकर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी गणेश छल्लारे यांनी सांगितले की बांधकाम कामगाराच्या नोंदणीसाठी शासनाचे सेवा शुल्क 85 रुपये सोडून नोंदणीसाठी कुणीही फी जास्त देऊ नये, आपण तालुका भर मजूर बांधकाम कामगारांच्या नोंदणी केल्या असून त्याचा कामगारांना लाभ मिळवून देताना समाधान वाटत असल्याचे सांगितले.
गणेशभाऊ छल्लारे यांनी बांधकाम कामगारा च्या नोंदणी करून शासनाच्या या योजनांचा लाभ देने कामी मोठी मदत केली असून, आम्हाला दोन वेळेस मध्यान भोजन, अवजार साहित्यासाठी पाच हजार रुपये, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची रक्कम मिळून दिली आहे,शासनाच्या या बांधकाम कामगारांसाठी असलेल्या योजनांचा आम्हाला मोठा आधार झाला आहे. त्याबद्दल गणेश भाऊ छल्लारे यांना धन्यवाद देत आहोत.
-संभाजी खंडागळे (बांधकाम कामगार, भोकर)