आदर्श शिक्षक श्री विष्णू मराठे सर यांनी कळसंबर येथील वृद्धाश्रमाला ज्वारी दिली मदत.

*आदर्श शिक्षक श्री विष्णू मराठे सर यांनी कळसंबर येथील वृद्धाश्रमाला 30 किलो ज्वारी दिली आहे*.
*पाडळसिंगी येथील आदर्श शिक्षक श्री विष्णू मराठे सर यांनी काल संघर्ष धान्य बँकेशी संपर्क साधला व आपणास संघर्ष धान्य बँकेत धान्य जमा करायचे असे सांगितले. त्यावेळी संघर्ष धान्य बँकेचे संचालक श्री शिवाजी झेंडेकर सर यांनी धान्य गेवराईला घेऊन येण्यापेक्षा बीडमध्येच कळसंबर येथील आपला परिवार वृद्धाश्रमाच्या संचालिका श्रीमती मनीषा पवार मॅडम यांच्याकडे सुपूर्द करण्याचे सुचवले.त्यानुसार आपला परिवार वृद्धाश्रमाच्या संचालिका श्रीमती मनीषा पवार मॅडम यांनी श्री मराठे सर यांच्या बीड येथील घरी जाऊन 30 किलो ज्वारी हे धान्य घेतले.तीन-चार दिवसांपूर्वी श्रीमती पवार यांनी वृद्धाश्रमाचे धान्य संपल्याचे सांगितले होते.श्री मराठे सर यांच्याकडून धान्य मिळाल्यामुळे त्यांनी संघर्ष धान्य बँकेचे व मराठे सरांचे आभार मानले आहेत.मित्रांनो आपणही आपली मदत संघर्ष धान्य बँकेत जमा करावी किंवा अनाथाश्रम,वृद्धाश्रम, गरजवंत कुटुंबे यांच्यापर्यंत पोहोच करून आम्हाला फोटो पाठवावेत आम्ही त्याला प्रसिद्ध देत जाऊ.श्री विष्णू मराठे सर यांचे खूप खूप आभार*