डॉ. निखिल उगले यांचे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धे मध्ये यश

डॉ. निखिल उगले यांचे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धे मध्ये यश :-
टाकळीभान: पाचेगाव तालुका नेवासा येथील वैद्यकीय सेवेतील प्रथितयश यश डॉ. निखिल उगले यांनी राज्यस्तरीय एक किलोमीटर जलतरण स्पर्धेमध्ये यश संपादन केले असून सदर स्पर्धा दिनांक १५ मार्च 2026 रोजी नाशिक ओपन वॉटर असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा वालदेवी डॅम नासिक येथे आयोजित केल्या होत्या.त्यामध्ये डॉ. निखिल उगले यांनी नगर जिल्ह्याचं नेतृत्व करून एक किलोमीटर जलतरण स्पर्धा ही २८ मिनिट व २२ सेकंद मध्ये पूर्ण करून महाराष्ट्रात तिसरा क्रमांक पटकावला. यासाठी त्यांच्या मातोश्री सिंधू सुधाकर उगले व पत्नी तन्वी उगले तसेच आजोबा डॉक्टर रामनाथ उगले चुलते दिलीप उगले व सासरे विठ्ठलराव गुंजाळ ,मामा कारभमित्रपरिवारव परिवर्तन पॅनल पाचेगाव, त्यांचा मित्रपरिवार यांचे सहकार्य लाभले. त्यांचे या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.



