आरोग्य व शिक्षण
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळीभान परिसराची ग्रामस्थांनी साफसफाई

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळीभान परिसराची ग्रामस्थांनी साफसफाई
टाकळीभान येथे2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळीभान येथील परिसराची ग्रामस्थांनी साफसफाई करून श्रमदानाने जयंती साजरी करण्यात आली श्रमदानातून व आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ करून प्रत्यक्ष कार्याला महत्त्व देऊन महात्मा गांधी यांना खऱ्या अर्थाने जयंती साजरी झाली. सामूहिक झालेल्या स्वच्छतेमुळे आरोग्य केंद्र व परिसर स्वच्छ चकाचक झाला. याप्रसंगी राजेंद्र कोकणे, अर्जुन राऊत, प्रा. कार्लस चाटे , श्रीधर गाडे काका, प्रकाशराव दाभाडे, अँड रत्नाकर रणनवरे, दिगंबर मगर ,मधुकर गायकवाड, बोर्डे वायरमन, अनिलराव दाभाडे, देविदास बनकर, आप्पासाहेब बनकर, तात्या पवार आदी उपस्थित होते.