क्रिडा व मनोरंजनदेश-विदेशमहाराष्ट्रराजकिय
केंद्र सरकारला ८ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा श्रीरामपूर तालुक़ाच्यावतीने विकास रथाचे…

केंद्र सरकारला ८ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा श्रीरामपूर तालुक़ाच्यावतीने विकास रथाचे…
केंद्र सरकारला ८ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा श्रीरामपूर तालुक़ाच्यावतीने विकास रथाचे टाकळीभान येथे ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले .
प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला ८ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र भाजपा युवा मोर्चाच्या वतीने युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा.विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर विकास रथ चे आयोजन करण्यात येत आहे.भाजपा आ. मा. मंत्री.राधाकृष्णा विखे पाटील, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजु भाऊ गोंदकर, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्रीराज डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर विधानसभा मतदार संघा मधे विकास रथ चे आयोजन करण्यात आले. आज या कार्यक्रमाअंतर्गत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सुनील वाणी, तालुकाध्यक्ष दिपक अण्णा पटारे, जिल्हा सचिव, अनिल भनगडे, मा. सभापती नानासाहेब पवार, युवा युवा मोर्चा उत्तर नगर संघटन सरचिटणीस योगराज परदेशी,मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रुपेश हरकल,, जिल्हा सचिव अक्षय नागरे, युवा मोर्चा श्रीरामपूर तालुकाध्यक्ष दत्ता जाधव,महेश खरात, प्रविण लिप्टे,, महेंद्र पटारे, योगेश ओझा, युवा मोर्चा उपाध्यक्ष संतोष महाडिक, ओमने सर, जिल्हा सरचिटणीस सुप्रिया धुमाळ, युवा सरचिटणीस विलास पटारे, मुकुंद हापसे, भाऊसाहेब पवार सोमनाथ बोरसे, अप्पा रनवरे, भाजपा श्रीरामपूर तालुका यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.
या विकास रथाच्या माध्यमातून भारताचे यशस्वी प्रधानमंत्री श्री.नरेंद्रजी मोदी यांनी ८ वर्षाच्या कालावधी मधील विकासकामे, जनकल्याणासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती तसेच युवा वर्ग,महिला वर्गांसाठी राबविण्यात आलेल्या योजना त्याची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच विविध योजनांचा लाभ जनतेने घ्यावा याकरिता विकास रथाचे आयोजन करण्यात आले होते.
Rate this post