गेवराई किराणा व्यापारी संघटना व आसरा फाऊडेशन द्वारे आयोजित

गेवराई किराणा व्यापारी संघटना व आसरा फाऊडेशन द्वारे आयोजित
भव्य रक्तदान शिबिरास उत्सफूर्त प्रतिसाद
गेवराई येथे बीड बायपास हायवे रोडवर जिजामाता जयंती निमित्त झालेल्या भव्य रक्तदान शिबीरास गेवराई करांनी उदंड प्रतिसाद दिला . यावेळी गेवराई व्यापारी महासंघांचे अध्यक्ष प्रतापराव खरात , गेवराई किराणा व्यापारी संघटना चे अध्यक्ष बाळासाहेब बरगे , आसरा फाऊंडेशन च्या वतीने अभिजीत काला , तुम्ही आम्ही गेवराईकर च्या वतीने ज्ञानेश्वर महाजन ,नाना पवार यांनी अन्नछत्रा ची व्यवस्था सांभाळली .यावेळी संतोष भालशंकर ,योगेश कापसे ,प्रतापराव खरात , पत्रकार दिनकर शिंदे , शिवाजी काळे , मंगेश बरगे , शैलेश जाजू , गणेश मोटे , सुरेश वादे , परमेश्वर मुठाळ ,महादेव सुरवसे ,भगवान आतकरे , दत्तात्रय चौधरी ,अक्षय टकळे ,रत्नपारखी अमोल , गणेश जाधव , प्रणव शेंडेकर , अभिषेक शिंदे , गणराज पवळे , प्रविण खरात , हितेश नाटकर , संजय भालशंकर , मारोती चित्रे , महाजन ज्ञानेश्वर , शिवाजीपवारअविनाश मोटे, सचिन लव्हाळे ,करण खाडे , धनंजय नाईकनवरे , शैलेश तोष्णीवाल , समीर सानप ,अमोल गंगवाल ,वरकड धिरज , वारमोडे ज्ञानेश्वर , रफीक बागवान ‘ शाम पांडे , रजनी पांडे , धनंजय बेद्रे , वसंत सुस्कर ,गणेश पवार , प्रतिक कदम , सोनाली सुस्कर ,संजयकुमार जैन , हरीभाऊ चाळक , नवनाथ वरपे ,आहेर मुंकुद ,गोपालमोरे ,शाम चाळक ,गजानन राजपूत ,शरद पवार , प्रशांत भुते , संजय सोनी ,तेजल सोनी , अमोल मस्के , अनुराग खेरगडे , भागवत शिंदे , मनोज गंगवाल , अर्चना गंगवाल ,सुरेश वाईकर , सतिश भालशंकर ,गणेश जायस्वाल ,अमोल होंडे , अभिजीत काला , भाऊसाहेब राजगुरु , सागर लाड , गणेश होंडे आदिनी रक्तदान केले . आईची आज्ञा व्यसनमुक्ती शिबीरा मार्फत धीरज काला , अभिजीत काला यांनी उपस्थिताना व्यसनमुक्तीची अभिनव शपथ दिली. मागील ५ वर्षापासून संघटनेकडून हा उपक्रम राबविला जातो. जेष्ट मार्गदर्शक गौतम चतुरमोहता , संभाहरे , कुटे हे ही उपस्थित होते , मुख्यमंत्र्याच्या हस्ते उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्राप्त दिनकर शिंदे यांनीही 22 व्या वेळी रक्तदान केले. व्यापारी संघटनेच्या व जागरूक गेवराईकरांनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.