स्वामी विवेकानंद यांचे विचार तरुणांना आधुनिक करणारे आहेत. – अॅड. वैशाली डोळस

स्वामी विवेकानंद यांचे विचार तरुणांना आधुनिक करणारे आहेत. – अॅड. वैशाली डोळस
राष्ट्रीय युवा दिना निमित्त “विकसित युवा विकसित भारत” विषयावर विशेष प्रचार कार्यक्रम उत्साहात संपन्न
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-औरंगाबाद आणि युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय, नेहरू युवा केंद्र, औरंगाबाद यांच्या सहकार्याने शिवछत्रपती महाविद्यालय, N3, औरंगाबाद येथे “विकसित युवा विकसित भारत” विषयावर विशेष प्रचार कार्यक्रम संपन्न
औरंगाबाद – दिनांक 12.01.2022 : ‘स्वामी विवेकानंद यांचे विचार तरुणांना आधुनिक करणारे आहेत’ असे प्रतिपादन अॅड. वैशाली डोळस यांनी केले. त्या भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-औरंगाबाद आणि युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय, नेहरू युवा केंद्र, औरंगाबाद यांच्या सहकार्याने दिनांक 12 जानेवारी 2023 (गुरुवार) रोजी राष्ट्रीय युवा दिना निमित्त “विकसित युवा विकसित भारत” विषयावर शिवछत्रपती महाविद्यालय, N3, औरंगाबाद येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर राज्य माहिती आयोग, औरंगाबाद खंडपीठाचे उपसचिव, राजाराम सरोदे, शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य आर. पी. पवार, केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-औरंगाबादचे प्रबंधक, संतोष देशमुख आणि नेहरू युवा केंद्र, औरंगाबादचे संकल्प शुक्ला आदी उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेला उष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन केले. यावेळी संतोष देशमुख यांनी प्रास्ताविक केले आणि शिवछत्रपती महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मनिषा राऊत यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्र शासनाच्या पंजीकृत आभा कला मंच, औरंगाबाद तर्फे देशभक्तीपर गीत व युवांसाठी प्रोत्साहन पर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संकल्प शुक्ला यांनी प्रश्नमंजुषा घेतली व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयापासून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली ज्यामध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले. शेवटी सर्वांनी एकत्रीतपणे युवा दिवसाची शपथ घेतली. यावेळी “भारत माता की जय” या जयघोषाने सभाग्रुह दणाणला होता. कार्यक्रमात अॅड. वैशाली डोळस यांनी जिजाऊ आणि स्वामीजींच्या विषयी युवकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-औरंगाबादचे सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार, प्रिती पवार, शरद सदिगले व प्रभात कुमार तसेच विश्वा युथ फाऊंडेशनचे संचालक, प्रकाश त्रिभुवन, शिवछत्रपती महाविद्यालयाचे गाडे सर व कर्मचारी, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक आदींनी परीश्रम घेतले.