कृषीवार्ता

भविष्यातील पाणी प्रश्नासाठी लढा देण्यास लोकसेवा विकास आघाडी सदैव तत्पर – सिद्धार्थ मुरकुटे.

भविष्यातील पाणी प्रश्नासाठी लढा देण्यास लोकसेवा विकास आघाडी सदैव तत्पर – सिद्धार्थ मुरकुटे.

 

टाकळीभान प्रतिनिधी- टाकळीभानला वरदान ठरलेले टेलटँक (गोविंद सागर) पूर्ण क्षमतेने भरले असून आज सकाळी ग्रामपंचायत टाकळीभानच्या वतीने सरपंच अर्चना रणनवरे, ग्रामपंचायत सदस्या अर्चना पवार व लता पटारे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे व अशोक कारखान्याचे व्हाइस चेअरमन भाऊसाहेब उंडे उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना सिद्धार्थ मुरकुटे म्हणाले की भविष्यात निळवंडे धरणाचे येत्या काही दिवसांत पूर्ण होऊन आपल्या परिसरातील पाणी प्रश्न निर्माण होणार आहे. याआधी देखील लोकनेते भानुदास मुरकुटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण पाण्यासाठी अनेक आंदोलन करून हक्काचे पाणी मिळवले आहे, पुढच्या काळात देखील लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने हक्काच्या पाण्यासाठी लढा सुरूच ठेवण्यात येईल त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. दरवर्षी टेल टँक भरावा यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

 

लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे म्हणाले की २००५ च्या समन्यायी पाणी वाटप कायद्याखाली टेलटँक साठी पाणी राखीव करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.

 

यावेळी टेल टँक पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी प्रयत्नशील असणारे पाटबंधारे विभागाचे बाळासाहेब कोकणे, जयकर कोठुळे व विनोद साठे यांचा सत्कार करण्यात आला.

     कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानत लोकनेते भानुदास मुरकुटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढा देण्यास तयार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य मयुर पटारे यांनी सांगितले.

    यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे ,ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय नाईक, दत्तात्रय मगर, यशवंत रणनवरे ,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मयूर पटारे, सुनील बोडखे, उपाध्यक्ष रावसाहेब वाघुले, शंकर पवार, संजय रणनवरे, संजय पटारे, धनराज कोकणे भैय्या पठाण, बबलू वाघुले, भागवत रणनवरे, काकासाहेब रणनवरे, युवक अध्यक्ष मल्हार रणनवरे, महेश लेलकर, भाऊसाहेब पटारे, शिवाजी पवार, संभाजी येवले उपस्थित होते.

 

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे