अपघात

गोपिनाथराव घुले – कर्तृत्वान मुख्याध्यापक व संस्थाचालक 

गोपिनाथराव घुले – कर्तृत्वान मुख्याध्यापक व संस्थाचालक 

 

शिक्षण ही पंढरी, जो शिकेल तो टिकेल, या म्हणी नुसार गोपिनाथ सुखदेव घुले सर यांनी शिक्षण क्षेत्रात केलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. गोपिनाथ घुले हे मुळचे केज तालुक्यातील केळगांव येथील रहिवासी असून त्यांचा जन्म 28 ऑगस्ट 1959 रोजी झाला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे गावात झाले. त्यांच्या घरची परिस्थिती जेमतेमच होती. परंतू परिस्थितीला न जुमानता त्यांनी शिक्षण घेण्यासाठी कंबर कसली होती. त्यांनी पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी ते बीड येथे प्रवेशीत झाले. त्यांची अभ्यासा विषयी आवड व कोणतीही गोष्ट शिकण्याची इच्छा पाहाता त्यांनी आपले शिक्षण चांगल्या व उत्कृष्ट रित्या पुर्ण केले. त्यानंतर त्यांनी शिक्षकी पदवी प्राप्त करुन शिक्षण क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी दिनेशराव लालाजी पवार यांच्या अंतरवन पिंपरी प्राथमिक आश्रम शाळा येथे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे धडे देण्यांचे कार्य सुरु केले. सर्व प्रथम त्यांनी बीड येथील अंतरवन पिंपरी प्राथमिक आश्रम शाळेत अधिक्षक म्हणून काम केले. गेवराई तालुक्यातील देवपिंपरी या ठिकाणी नवीन आश्रम शाळेची सुरूवात जेमतेम विद्यार्थ्यी घेऊन सन 1992 यावर्षी करण्यात आली. नंतर सर्व शिक्षकांच्या सहकार्य व मेहनत नंतर व दिनेशराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गेवराई शहरातील नाईक नगर या ठिकाणी सदर आश्रम शाळेची उभारणी केली. घुले गोपीनाथ यांचे कार्य पहाता त्यांना संस्थेचे अध्यक्ष दिनेशराव लालाजी पवार यांनी त्यांची मुख्याध्यापक या पदावर निवड केली. त्यांना मिळालेल्या या पदाचा सदउपयोग करून गरजुवंत विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी नेहमी ते सहकार्य करत. त्यांच्याकडे एक वेगळीच कला असून ते आपल्या सहकार्याकडून खेळी मेळीच्या वातावरणात काम करून घेत. ते एवढ्यावरच न थांबता त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी गेवराई शहरात आदर्श नगर या ठिकाणी मुलांसाठी वस्तीगृहाची स्थापना करुन त्या वस्तीगृहा मार्फत गरंजु विद्यार्थ्यांना राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध करून दिली. तसेच श्री क्षेत्र उत्तरेश्वर शिक्षण संस्था, केळगाव पो.मस्साजोग ता.केज जि.बीड या संस्थेची स्थापना सन २००० मध्ये करून त्यांनी या संस्थे अंतर्गत गेवराई तालुक्यातील जायकवाडी वसाहत बागपिंपळगाव या ठिकाणी श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय जायकवाडी वसाहत बागपिंपळगाव या मराठी शाळेची उभारणी करून या गावाच्या जवळपास असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दालन उघडले. तसेच या शाळेच्या माध्यमातून त्यांनी १५ कर्मचाऱ्यांना रोजगार मिळवून दिला. त्यांनी शिक्षण क्षेत्रात घेतलेली भरारी एवढ्यावरच न थांबता त्यांनी आश्रम शाळेच्या प्रगतीसाठी केलेले कार्य वाखाणण्याजोगी आहे. त्यांची नंतर आश्रम शाळेच्या प्राचार्या पदी निवड करण्यात आली. 28 ऑगस्ट 2017 रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले. या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना 2008 साली नगर परिषद गेवराई जिल्हा बीड यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच 2012 साली शारदा प्रतिष्ठान गेवराई जिल्हा बीड यांनीदेखील आदर्श शिक्षक पुरस्काराने सरांना सन्मानित करण्यात आले होते. या सर्व कार्यामध्ये त्यांच्या पत्नीचे त्यांना नेहमी सहकार्य लाभले. त्यांनी हे काम करीत असताना आपल्या मुलांना ही शिक्षण घेतल्यापासून मागे ठेवले नाही. घुले सर यांना तीन मुले व दोन मुली असे एकूण पाच अपत्य असून त्यांनी आपल्या पाचही मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिले आहे. त्यातील मोठा मुलगा प्रदिप घुले यांची नुकताच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या क्लास वन अधिकारी पदी निवड झाली आहे. जमीन से जुडा आदमी, सरांची ही प्रतिमा पुढे ही कायम राहील सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

 

 

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे