बीड मध्ये घरफोडी, माजलगावात मोटारसायकल चोरी,गेवराई त टेंम्पो चोरी तर अंमळनेरात पवनचक्की च्या सामानावर चोरट्यांचा डल्ला*

बीड मध्ये घरफोडी, माजलगावात मोटारसायकल चोरी,गेवराई त टेंम्पो चोरी तर अंमळनेरात पवनचक्की च्या सामानावर चोरट्यांचा डल्ला*
बीड शहरातील बोबडेश्वर गल्ली सराफी लाईन मधिल मंगल कोळगावकर यांच्या वाड्यात रात्री चोरट्यांनी भींती वरून चढत प्रवेश करून लटकवलेल्या चाव्या घेऊन कपाटातील सोन्याचे दागीणे तसेच नकदी असा 3 लाख 88 हजाराचा माल चोरीस गेल्याने अज्ञाता विरूद्ध बीड शहर पोलीस स्टेशनला कलम 457,153,380 नुसार गुन्हा नोंद आहे .
*गेवराई तालूक्यातील*
पोखरी येथील गोविंद मोघे वय 42 यांचा टाटा कंपनीचा तपकिरी रंगाचा टैम्पो त्याचा पासिंग क्र एम एच 14 सीपी 6666 ज्याची किंमत 4 लाख रू किमतीचा अज्ञात चोरांनी पहाटे 4 ते 5..30 दरम्यान अज्ञाताने चोरून नेल्याने गेवराई पोलिस स्टेशन मध्ये कलम 415 379 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला
*गोशाळेतील गाईवर पण भुरट्यांनी मारला हात*
बीड ग्रामीण पोलिस स्टेशन हदीतुन प्रीती सूधाजी गोशाळा घोसापूरी येथुन अज्ञात चोराने गुरुवार रोजी रात्री आठ वाजे दरम्यान गोशाळे चे कुलूप तोडूण चार गाई चोरी स गेल्याने बीड ग्रामीण पोलिस स्टेशन ला विलास पाटील यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा नोंद आहे
*पवनचक्की च्या सामानावर ही चोरांचा डल्ला*
अमंळनेर पोलिस स्टेशन हदीतील मुरगाव शिवारातील गट नं 755 मधील पवनचक्की बायोटेक व्हिजन केअर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या 5 नं पवनक्की चे सामान व इलेक्ट्रीक सामान असा माल किमंत 8 लाख अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याने सी रत्नाकर यांच्या तक्रारीवरून अंमळनेर पोलिस स्टेशन ला कलम 89/ 379 नूसार गुन्हा नोंद आहे
*माजलगाव शहरातील*
समता कॉलनी येथील रहिवासी शरद कदम यांची हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटार सायकल जिचा पासिंग क्रंमाक एम एच 44 एल 6419 ही समता कॉलनी परिसरतुन गुरूवार रोजी चोरी गेल्याने शहर पोलीस स्टेशन ला कलम 225 ,379 नुसार गुन्हा नोंद आहे ,