आमदार संतोष बांगर साहेब यांनी हिंगोलीतील श्रीमती शांताबाई दराडे माध्यमिक विद्यालया तील विद्यार्थ्यांशी साधला संवाद….

*आमदार संतोष बांगर साहेब यांनी हिंगोलीतील श्रीमती शांताबाई दराडे माध्यमिक विद्यालया तील विद्यार्थ्यांशी साधला संवाद….!!!*
*शाळेच्या बाजूस असलेल्या नाल्याची दुरुस्ती करण्यासाठी लागेल तेव्हढा निधी देणार*
*- आ.संतोष बांगर*
आज *हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांनी हिंगोलीतील श्रीमती शांताबाई दराडे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आमदार बांगर साहेब म्हणाले की शालेय जीवनातील हा काळ म्हणजे सुवर्णकाळ असतो त्यामुळे सर्वांनी निर्व्यसनी राहून अभ्यासावरच लक्ष दिले पाहिजे आणि स्वतःचे आयुष्य सुंदर बनवले पाहिजे तसेच सर्वांनी आपल्या आई वडिलांचे, गुरुजनांचे ऐकले पाहिजे यावेळी आमदार संतोष बांगर साहेब यांचे भाषण ऐकताना विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य संचारले होते तसेच यावेळी आमदार संतोष बांगर साहेब यांनी सर्वांना येत्या 8 तारखेस राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात येणाऱ्या भव्य कावड यात्रेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले.* तसेच *शाळेच्या बाजूस असलेल्या नाल्याचे पाणी शाळेच्या आवारात घुसून नेहमीच विद्यार्थ्यांना त्रास होतो त्यामुळे लागेल तेवढा निधी देऊन शाळेची ही समस्या कायमची दूर करणार असल्याचे देखील यावेळी आमदार बांगर यांनी सांगितले.*
यावेळी जि. प. समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे, युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, मुख्याध्यापक डॉ अंभोरे सर, उपमुख्याध्यापक श्री भट्ट सर,गजानन बांगर सर, कुलकर्णी सर, गोरे मॅडम, डोईफोडे, सर, लोळेवार सर, गिराम सर, शिंदे सर, गहिरवार सर, शिरसाट सर, मस्के सर, मोरे सर, कल्याणी मॅडम, राजपूत सर, पाठक सर, चुकेवार सर, सोळंके सर, वाबळे मॅडम, होटगीर सर, पंढरी मगर, सचिन पवार, नितीन होकर्णे व मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते.