अंबिका माध्यमिक विद्यालयाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त…..

अंबिका माध्यमिक विद्यालयाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त…..
आज सकाळी अंबिका माध्यमिक विद्यालयाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर झेंडा हर घर झेंडा या न्यायाने समाजामध्ये गावामध्ये जनजागृती व्हावी याकरिता पाचशे विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी घोषवाक्य असलेले फलक विद्यार्थ्यांनी हातात धरले होते वंदे मातरम भारत माता की जय तिरंगा मेरी जान है तिरंगा मेरी शान है जब तक सुरज चांद रहेगा तिरंगा हमारा आबाधित रहेगा अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला होता यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत समोर जमा होऊन त्या ठिकाणी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय गुंजाळ सर यांनी भारतीय ध्वजाची आचारसंहिता समजून सांगितले यावेळी डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक उत्तमराव आढाव यांनी मोदी सरकारच्या या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे व 13 ते 15 तारखेला प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवावा असे आवाहन केले केले यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक गोरक्षनाथ घुमे अशोक काळे गणेश म्हसे शिवनाथ डमाले शिक्षिका मंदाकिनी बर्डे किरण तावरे प्रियंका जाधव मोरे मॅडम आदींनी सहभाग घेतला भारत विटनोर यांनी आभार मानले