सामाजिक न्याय विभागाकडून श्रीगोंदा आगार प्रमुखांना वेगवेगळ्या विषयां वर निवेदन

सामाजिक न्याय विभागाकडून श्रीगोंदा आगार प्रमुखांना वेगवेगळ्या विषयां वर निवेदन
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाकडून श्रीगोंदा आगार प्रमुखांना वेगवेगळ्या विषयां वर निवेदन देण्यात आले सविस्तर माहिती अशी की श्रीगोंदा आगाराच्या आवारात पार्किंगची व्यवस्था नाही तसेच श्रीगोंदा आगाराच्या आवारात स्वच्छता व परिवहन विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार त्या ठिकाणी प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष राहुल बागे यांनी केल्या आहेत..
श्रीगोंदा परिवहन विभागाच्या बसेस या तालुका जिल्हा व महाराष्ट्रभर प्रवाशांना घेऊन दररोज भ्रमण करत असतात. श्रीगोंदा शहरातून व तालुक्यातून बाहेरगावी कामानिमित्त, व्यवसाय निमित्त तसेच नोकरीनिमित्त अनेक लोक एसटी बसने प्रवास करतात व पुन्हा परत येतात यादरम्यान त्यांच्या दुचाकी व चारचाकी गाड्या लावण्याचा फार मोठा प्रश्न निर्माण होत आहे. बहुतेक बाहेरगावचे प्रवासी त्यांचे त्यांच्या गावातून श्रीगोंदा बस स्थानकामध्ये येण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या दुचाकी व चार चाकी गाड्यांचा वापर करतात अशी परिस्थिती असताना या प्रवाशांना त्यांच्या गाड्यांना पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे अत्यंत गैरसोय निर्माण होत आहे तसेच दिवसभर गाड्या इतरत्र पार्किंग साठी लावल्याने त्यांच्या गाड्या चोरी जाण्याचा धोका देखील निर्माण झालेला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून एसटी परिवहन आगाराने प्रवाशांना तातडीने पार्किंगचे सोय करून द्यावी तसेच श्रीगोंदा आगाराच्या आवारात दररोज खूप मोठ्या प्रमाणावर प्रवासी येत असतात श्रीगोंदा आगाराचे आवार खूप मोठे आहे. परंतु या ठिकाणी स्वच्छता नसल्याने प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना तसेच आगाराच्या आवारात असलेल्या व्यवसायिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे तसेच सध्या पावसाचे दिवस असल्याने या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात कुबाभळी तसेच गवताची बेसुमार अशी वाढ झालेली आहे.यातून आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे तरी सदर ठिकाणी आगाराने तातडीने स्वच्छता करावी व श्रीगोंदा आगारामध्ये परिवहन विभागामार्फत दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार आगार व्यवस्थापन प्रमुख नात्याने प्रवाशांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागातर्फे दिले आहे व या मागण्यांवर गांभीर्याने विचार करून वरील मागण्या तात्काळ मान्य कराव्या व त्यावर कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले आहे.निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीणभैय्या शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदीप उमाप, तालुका कार्याध्यक्ष गोरख घोडके, खादी ग्रामोद्योग मा चेअरमन नंदकुमार ससाने, सामाजिक न्याय विभागाचे तालुका सचिव शैलेंद्र सांगळे, युवा नेते शिवा घोडके, शहर कार्याध्यक्ष जितेंद्र पाटोळे, किशोर नेटके, बहुजन रयत परिषदेचे ताल अध्यक्ष रतन ससाने, लालाभाऊ ससाने, नितीन ससाने, नंदू ससाने, ज्ञानदेव शिरवाळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…