वाघिरा गावाकडून भगवान गडाला ७५ लाखाची देणगी; मंदिरे ही समाजाची शक्ती स्थळे -नामदेवशास्त्री*

*वाघिरा गावाकडून भगवान गडाला ७५ लाखाची देणगी; मंदिरे ही समाजाची शक्ती स्थळे -नामदेवशास्त्री*
भगवान गडाच्या विविध विकास कामांसाठी वाघिरा गावकऱ्यांकडून भगवान गडाला ७५ लाख रुपयांची देणगी देण्यात आली . काल ३ ऑगस्ट रोजी भगवान गडाचे महंत न्यायाचार्य डॉ . नामदेवशास्त्री यांचे वाघियत काल्याचे कीर्तन झाले , त्यावेळी गावकऱ्यांनी ही मदत दिली . या संदर्भात पाश्र्वभूमीशी बोलतांना डॉ . नामदेवशास्त्री म्हणाले की , गोरगरीब , कष्ट लोकांनी गडाला आतापर्यंत मदत केलेली आहे . सकल समाजाची गडावर श्रद्धा आहे धार्मिक अधिष्ठाण असेल तर समाज नितीच्या मार्गावर चालतो . मंदिरेही शक्ती स्थळे आहेत त्याचे महत्व कमी होऊ न दिले पाहिजे . पाटोदा तालुक्यातील बाघिरा या गावी भगवान गडाचे डॉ . नामदेवशास्त्री यांचे काल्याचे कीर्तन झाले काल्याच्या कीर्तनासमोर उपस्थित भाविक भक्तांसमोर बोलतांना डॉ . नामदेवशास्त्री म्हणाले की , बाघिरा गावाने भगवान गडाला ७५ लाख रुपयांची देणगी जमा केलेली आहे . सदर कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर बीडवरून जात असतांना महाराजांची भेट प्रा नितीन आघाव यांच्या निवासस्थानी झाली . यावेळी त्यांनी बाघिरा येथील ग्रामस्थांनी दिलेल्या निधी संदर्भातील माहिती दिली . ते म्हणाले की , गोरगरीब , वंचित आणि कष्टकरी लोकांनी भगवान गडाला नेहमीच मदत केली आहे .
ज्ञानेश्वर माऊलींचे 22 कोटींचे भव्यदिव्य मंदिर उभारणार-महंत नामदेव शास्त्री
२०२६ हे भगवान गडाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे . त्या निमीत्त भगवान गडावर भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे . भगवान गडावर भव्य असे अद्वितीय असे ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर उभा करण्याचा संकल्प डॉ . नामदेवशास्त्री यांनी बोलून दाखविला . याचीतयारी चालू आहे . देशभरातून तज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात आहे . काळ्या पाषाणात भव्य असे हे मंदिर उभारण्याची तयारी सुरु झाली आहे भगवान गडाच्या विकासाला आजपर्यंत कधीच आर्थिक चणचण जाणवली नाही हे भगवानयायांचा आशिर्वाद असल्याचे नामदेवशास्त्री यांनी सांगितले.