राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या नेवासा तालुकाउपअध्यक्षपदी चंद्रकांत जावळे यांची निवड.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या नेवासा तालुकाउपअध्यक्षपदी चंद्रकांत जावळे यांची निवड.
नेवासा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुका.उप अध्यक्षपदी चांदा येथील चंद्रकांत बापूराव जावळे यांची निवड करण्यात आली असून नुकतेच त्यांना निवडीचे पत्र खासदार निलेशजी लंके व नेवासा तालुक्याचे अध्यक्ष सतीश पांडुरंग थोरात यांनी दिले असून त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे आदरणीय शरदचंद्र पवार यांचे पुरोगामी विचार सर्वसामान्या पर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच पक्षाचे ध्येय धोरणे समाजामध्ये रुजविण्यासाठी व पक्ष संघटना मजबूत करणे कामी आपली नियुक्ती करण्यात आलेली आहे असेही नियुक्ती पत्रात म्हटले आहे .
शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वसामान्य जनतेच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावे आपण राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात अनुभवी आहात. याप्रसंगी सतीश थोरात तालुका अध्यक्ष नेवासा रावसाहेब पा काळे कैठा गावचे माजी सरपंच .सोमनाथ भालके मेंबर, बाळासाहेब दहातोंडे कृषी उत्पन्न समितीचे चेअरमन .संभाजीराव दहातोंडे, अशोकराव जावळे, निरजशेठ मनोचा, बाजिराव म्हसे, सादिक शेख, दत्तोबा जावळे, गणेश पाठक, अविनाश मरकड, भाऊ शिर्के उपस्थित होते