वाघाचा आखाडा येथील नव्यानेच स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत दुर्गामाता जनसेवा मंडळाने

राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा येथील नव्यानेच स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत दुर्गामाता जनसेवा मंडळाने बाजी मारली. सातपैकी चार जागा मिळवून दुर्गामाता जनसेवा मंडळाने सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या. तर जनविकास मंडळाने अवघ्या तीन जागा पटकाविल्याने त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले. दरम्यान या निवडणुकी तएकमेव अपक्ष महिला उमेद्वाराला मात्र, अपयशाचे तोंड पहावे लागले.जनविकास मंडळ व दुर्गामाता जनसेवा मंडळ यांच्यात दुरंगी लढत झाली. वाघाचा आखाडा ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झालेले दुर्गामाता जनसेवा मंडळाचे उमेद्वार प्रशांत भालचंद्र सप्रे(156), लिलाबाई अण्णासाहेब तनपुरे (242), निर्मला सुभाष कटारे(234), गोरक्षनाथ गोविंद बर्डे (225) हे चौघे विजयी झाले. तर जनविकास मंडळाचे आदिनाथ बाळासाहेब तनपुरे(222), रोहिणी सुनील सप्रे(185), रंजना भाऊसाहेब वाघ (181) हे तिघे उमेद्वार निवडून आले आहेत.ग्रामपंचायतीची पहिलीच निवडणूक असल्याने दोन्ही मंडळात अत्यंत अटीतटीची लढत झाली. यावेळी दोन्ही मंडळांनी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळे या निकालाकडे राहुरी तालुक्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले होते. निकालानंतर दुर्गामाता मंडळाच्या समर्थकांसह विजयी उमेद्वारांनी जल्लोष केला.यावेळी नामदेव धसाळ, प्रशांत कटारे, किशोर दोंड, कैलास तनपुरे, भालचंद्र सप्रे, लक्ष्मण तनपुरे, उत्तम वाघ, राजेंद्र सप्रे, सचिन सप्रे, बंटी सप्रे, अमोल धसाळ, परसराम सप्रे, काशिनाथ गागरे, मोहन कटारे, बाजीराव कटारे, सुभाष कटारे, सिद्धांत सप्रे, संतोष कटारे, धनंजय सप्रे, प्रकाश सप्रे, मुकेश तनपुरे, सिद्धू तनपुरे, शुभम दोंड, दादासाहेब कटारे,रवींद्र तनपुरे, आदींनी परिश्रम घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय राठोड यांनी काम पाहिले.