न्यायधीश राजेंद्र तुवर यांची टाकळीभान येथील श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिरास भेट.

न्यायधीश राजेंद्र तुवर यांची टाकळीभान येथील श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिरास भेट.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील पुरातन असलेल्या श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिरास औरंगाबाद जिल्हा न्यायालयाचे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायधीश राजेंद्र मुरलीधर तुवर व पत्नी सौ. रोहिनी तुवर यांनी भेट देवून श्री. विठ्ठल रूख्मिणीचे दर्शन घेतले.
न्यायधीश राजेंद्र तुवर हे नेवासा तालूक्यातील पाचेगाव येथील रहिवासी असून सध्या ते औरंगाबाद जिल्हा न्यायालयात वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायधीश असून आज त्यांनी येथील श्री. विठ्ठलरूख्मिणी मंदिरास सपत्नीक भेट दिली व श्री. विठ्ठल रूख्मीणीचे दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिर देवस्थानचे पुजारी, पत्रकार विजय देवळालकर यांनी श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिरा विषयी न्यायधीश तुवर यांना माहिती दिली.
यावेळी राहूल पटारे, राजेंद्र कोबरने, अनिल मगर, शिवाजी वखरे, विक्रम मगर, एकनाथ पटारे,अशोक पवार, सुभाष ब्राम्हणे, विजय तुवर उपस्थित होते.
टाकळीभान— येथील पुरातन श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिरास न्यायधीश राजेंद्र तुवर यांनी भेट देवून दर्शन घेतले. यावेळी सौ. रोहिनी तुवर, राहूल पटारे,
पत्रकार विजय देवळालकर, शिवाजी वखरे, एकनाथ पटारे आदी.