
टाकळीभान येथे शिवदर्शन पोवाड्याचा कार्यक्रम उत्सहात संपन्न.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तर धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत शिवजयंती उत्सव समिती यांच्या वतीने शिवशाहीर रामानंद उगले यांचा शिवशाहीर पोवाड्याचा कार्यक्रम नूकताच मोठ्या उत्सहात संपन्न झाला.
टाकळीभान येथील जि.प.प्राथमीक शाळेच्या प्रांगणात दि.१ एप्रिल २०२२ रोजी सायं.७ वा. छत्रपती शिवाजी महाराज जयंती व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत शिवदर्शन पोवाड्याचा कार्यक्रम शिवशाहीर रामानंद उगले यांच्या पहाडी आवाजात संपन्न झाला.
भव्य असे स्टेज डेकोरेशन त्याचबरोबर लक्ष वेधून घेणार्या छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या भव्य अशा प्रतिमा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या. शाहीरी बाज, व डफावर पडलेली थाप यामुळे उपस्थितांच्या अंगावर शहारे येत होते. शिवशाहीर रामानंद उगले यांच्या पहाडी आवाजातील पोवाड्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते.
यावेळी मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी तसेच टाकळीभान सह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. प्रथमत:सेवा निवृत्त पो.नि. गोरक्षनाथ बनकर व कमांडो सौरभ कोकणे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या घोषनेने आसमंत दुमदुमून गेला होता.
कार्यक्रम यशस्वितेसाठी उपसरपंच कान्हा खंडागळे मित्रमंडळ, शिवसेना तालुका प्रमूख दादासाहेब कोकणे मित्रमंडळ व शिवजयंती उत्सव समिती प्रयत्नशील होते.
Rate this post