कृषीवार्ता

निमगाव गांगर्डा येथील शेतकऱ्याने ऊसात फिरविला ट्रॅक्टरने रोटा

निमगाव गांगर्डा येथील शेतकऱ्याने ऊसात फिरविला ट्रॅक्टरने रोटा

 

 

कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील शेतकऱ्याचा कारखान्यावर ऊस नेण्यास टाळाटाळ होत असल्याने वैतागून आपल्या शेतातील ऊसात ट्रॅक्टरने रोटा फिरविला. यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
शेतामधील ऊस कारखान्यावर नेला जात नसल्याने कर्जत तालुक्यामधील निमगाव गांगर्डा येथील शेतकरी कल्याण रावसाहेब सटाले यांनी वैतागून आज अचानक आपल्या शेतातील उभ्या ऊसाच्या पिकात ट्रॅक्टरने रोटा फिरविला. जिवापाड कष्ट करून उभा राहिलेल्या ऊसात रोटा फिरविताना शेतात झालेली नुकसान पाहत शेतकरी सटाले यांना अक्षरशा ढसाढसा रडू कोसळले.
या घडलेल्या प्रकाराची आज दिवसभर सर्वत्र चर्चा होत होती. शेतकरी सटाले यांनी निमगाव गांगर्डा येथील हाडोळा (तिरमल वस्ती) जवळ आपल्या शेतात गट क्रमांक १९० मध्ये दीड एकर ऊसाच्या पिकाची लागवड केली होती.
जोमाने आलेले ऊसाचे पिक तालुक्यातील कारखान्यावर देण्याकरिता त्यांनी फिल्ड अधिकाऱ्याकडे नोंद केली होती.
दहाव्या महिन्याच्या ऊसाच्या नोंदी नंतर तब्बल सतरा महिने लोटले तरी ऊस जात नसल्याने शेतकरी सटाले यांनी संबंधित कारखान्याच्या फिल्ड अधिकाऱ्याकडे तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे ऊस नेण्याबाबत विनंती केली. परंतु मागील पाच महिन्यांपासून विनंती करूनही ऊस नेण्यास टाळाटाळ होत आहे. तर याच परिसरात नऊ महिन्यांची नोंद असलेला ऊस नेला जात आहे. आपल्या ऊसाची दहाव्या महिन्याची नोंद असून सतरा महिने होऊनही ऊस नेला जात नसल्याने त्यांनी आज अचानक आपल्या शेतातील ऊसात ट्रॅक्टरने रोटा फिरविण्याचा निर्णय घेतला. कारखान्याने ऊस न नेल्याने शेतकरी सटाले यांच्यावर ऊसात रोटा फिरविण्याची वेळ आल्याने यामध्ये त्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
तर या परिसरात दुसऱ्या कारखान्याच्या ऊस तोडणी टोळ्या देखील येऊन दिल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. आ.पवार यांच्या मतदारसंघात असलेल्या निमगाव गांगर्डा या ठिकाणी अशी परिस्थिती असल्याने याबाबत त्यांनी लक्ष घालावे अशी मागणी शेतकरी सटाले यांनी यावेळी केली..

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे