महाराष्ट्र

अपघातात जखमी झालेल्या अनिल गायकवाड यांना आर्थिक मदत व आगीत घर जळालेल्या कुटुंबास मदत

 अपघातात जखमी झालेल्या अनिल गायकवाड यांना आर्थिक मदत व आगीत घर जळालेल्या कुटुंबास मदत

श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील उपसरपंच कान्हा खंडागळे मित्रमंडळ व संविधान ग्रुपच्या वतीने आगीत घर जळालेल्या अरूण पेत्रस रणनवरे कुटुंबास व अपघातात जखमी झालेल्या अनिल नानासाहेब गायकवाड यांना उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात आली आहे.
         अनिल नानासाहेब गायकवाड यांचा मागील काही दिवसापूर्वी शेवगाव परिसरात अपघात झाला होता व  त्या अपघातात त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली होती त्यात त्यांच्या कुटुंबाची  परिस्थितीही जेमतेम असल्याने त्यांनी काही प्रमाणात रक्कम जमा केली मात्र  त्यात पूर्ण इलाज होणे अवघड झाल्याचे समजताच  कान्हा खंडागळे मित्रमंडळाच्या वतीने त्यांना पाच हजार रूपये आर्थिक मदत देण्यात आली.
        अरुण पेत्रस रणनवरे  यांचे  घर आगीत जळून गेल्यामुळे त्यांचे संसार उपयोगी साहित्य जळून गेल्याने या कुटुंबावर मोठा आघात झाला असून त्यांना कान्हा खंडागळे मित्र मंडळ व संविधान ग्रुपच्या वतीने संसार उपयोगी साहित्य, किराणा, कपडे  व घरासाठी  त्यांना मदतीचा हात पुढे करून ६ पत्रे ,१० पोल ,व लोखंडी पाईप देण्यात आले आहे.
     यावेळी कान्हा खंडागळे, संविधान ग्रुपचे अध्यक्ष मेजर विनोद रणनवरे, माजी उपसरपंच भारत भवार,
विलास दाभाडे, विलास सपकाळ, गणेश गायकवाड,
सुंदर रणनवरे, आबासाहेब रणनवरे, महेंद्र संत, संतोष
रणनवरे आदी उपस्थित होते.
टाकळीभान— येथील कान्हा खंडागळे मित्र मंडळ व
संविधान ग्रुपच्या वतीने अनिल गायकवाड यांना उपचारासाठी आर्थिक मदत व आगीत घर जळून गेलेल्या अरूण रणनवरे यांच्या कुटूंबास संसार उपयोगी साहित्य व घरासाठी पत्रे, पोल, लोखंडी पाईप मदत देण्यात आली आहे.
Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे