घुमनदेव येथे शिवसेनेच्या वतीने असलम इनामदार यांचा….

घुमनदेव येथे शिवसेनेच्या वतीने प्रो कबड्डी लीग 2022 श्रीरामपूर तालुक्याचे नाव उंचावणारे टाकळीभान गावचे कबड्डी खेळाडू श्री असलम इनामदार यांचा घुमनदेव शिवसेना व ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी असलम इनामदार यांचे फटाक्यांच्या अतिषबाजी ने भव्य स्वागत करण्यात आले यावेळी श्रीरामपूर शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री सुनील गायकवाड यांच्या हस्ते असलम इनामदार यांचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री.अशोक गायकवाड सर यांनी मनोगत व्यक्त केले सातत्याने प्रयत्न करत राहिले तर यश नक्कीच प्राप्त होते आणि अस्लम इनामदार याने आजच्या तरुण पिढीला हे दाखवून दिले, तसेच घुमनदेव येथील बबलू दवंगे यांचीदेखील बँक ऑफ बडोदा यांच्याकडून खेळण्यासाठी निवड झाली आहे असे सांगण्यात आले. यावेळी माजी सरपंच नवले ,राजेंद्र राजपूत, माजी उपसरपंच रंजीत बोडखे, खा.गोविंदराव आदिक शिक्षक ग्रामीण बँकेचे चेअरमन बाळासाहेब बनकर सर, राहुल कोकणे सर,वसीम इनामदार ,बाबा इनामदार, सतीश कांगुणे सर,पंकज जाधव,गणेश वेताळ,देवेंद्र बोडखे,सागर वाघमारे,मनीष वेताळ सर,सोपान मते,धनंजय वेताळ ,भाऊ वेताळ,नानासाहेब मोरे,राजेंद्र बोडखे, गणेश भाऊ,बबलू दवंगे,विजू दवंगे,सुनील राजपूत बापू जाधव व घुमनदेवचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.