भेंड खुर्द सुलतानपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेच्या उर्मिला खांडे यांची बिनविरोध निवड.

भेंड खुर्द सुलतानपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी
शिवसेनेच्या उर्मिला खांडे यांची बिनविरोध निवड.
गेवराई ( प्रतिनिधी ) तालुक्यातील भेंड खुर्द व सुलतानपूर या ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी निवडणूक झाली असून, यात शिवसेनेच्या उर्मिला प्रदीप खांडे यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर शिवसैनिकांनी व ग्रामस्थांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.
भेंड खुर्द व सुलतानपूर या ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव आणल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. या रिक्त पदासाठी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. सरपंच सौ अश्विनी धनेश्वर खेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत उपसरपंच पदासाठी शिवसेनेच्या उर्मिला प्रदीप खांडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. सौ अलका कचरू नवगिरे यांनी सूचक म्हणून त्यांचा उमेदवारी अर्ज भरला होता. या निवड प्रक्रियेसाठी अध्यक्ष अधिकारी म्हणून सरपंच आश्विनी धनेश्वर खेत्रे, निरीक्षक मंडळाधिकारी एन एस खेडकर, तलाठी ए ए औटे, ग्रामसेवक जे एस डांगे यांनी काम पाहिले. या सभेस ग्रामपंचायत सदस्य नवगिरे अलका कचरू, खांडे उर्मिला प्रदीप, कोळपे दिगंबर विठ्ठल, कांबळे कालींदा पंडित, शिंदे अश्विनी शंकर, बांगर कविता अशोक, खेत्रे अश्विनी धनेश्वर या ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती होती. शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, शिवसेना जिल्हा समन्वयक तथा माजी अर्थ व बांधकाम सभापती यूधाजित पंडीत यांच्या नेतृत्वाखाली भेंड खुर्द, सुलतानपूर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. नवनिर्वाचित उपसरपंच उर्मिला खाडे यांचा माजी सरपंच जगन शिंदे, माजी सरपंच गोरख शिंदे, धनेश्वर खेत्रे, विलासराव शिंदे, मधुकर शिंदे, चेअरमन शिवनाथ शिंदे, गणेश शिंदे, दशरथ शिंदे, राम उबाळे, चंदुलाल शिंदे, चंद्रकांत उबाळे, लहू खांडे, प्रदीप खांडे कुसुम आदींनी पुष्पहार घालून सत्कार केला.
उपसरपंचपदी उर्मिला खांडे यांची निवड जाहीर होताच शिवसैनिक आणि ग्रामस्थांनी डफडे, ताशा, वाजवत, गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.