टाकळीभान येथे सुरू असलेले शासनाचे जागेवरील अनाधिकृत बांधकाम बंद करावे या मागणीसाठी उपोषण सुरू.

टाकळीभान येथे सुरू असलेले शासनाचे जागेवरील अनाधिकृत बांधकाम बंद करावे या मागणीसाठी उपोषण सुरू.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील गट नं. २४५, २५० मधील अनाधिकृत बांधकाम बंद झाले पाहिजे, गट नं २४५मधील खरेदीमध्ये अनिधिकृतपणे शासनाची फसवणूक करणारे अधिकारी यांची वरीष्ठ पातळीवर चौकशी होवून त्यांना शासन व्हावे, गट नंबर २५० मधील शासनाच्या जागेवर अनाधिकृतपणे खोदाई व बांधकाम सुरू असून हे बांधकाम तात्काळ बंद करून पाडण्यात यावे व शासनाची जागा शासनाने ताब्यात घ्यावी या प्रमुखमागण्यांसाठी अप्पासाहेब नानासाहेब रणनवरे यांनीआज दिनांक १ मार्च पासून अमरण उपोषण सुरू केले आहे.
आप्पासाहेब रणनवरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर व तहसिलदार श्रीरामपूर यांचेकडे मौजे टाकळीभान ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर येथील गट नं. २४५, २५० मध्ये शासनाच्या जागेवर आनाधीकृतपणे खोदाई व बांधकाम सुरु आहे ते तत्काळ बंद करून शासनाची जागा शासनाने ताब्यात घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केलेली आहे व हे अनाधिकृत बांधकाम बंद न झाल्यास १ मार्च पासून उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे.
आज दिनांक १ मार्च पासून आप्पासाहेब रणनवरे यांनी तलाठी कार्यालयाच्या समोरील बाहेरच्या बाजूस उपोषण सुरू केले आहे. यावेळी अशोक कारखान्याचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव साळुंके,
लोकसेवा महाविकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, अशोक कारखान्याचे संचालक यशवंत रणनवरे, ग्रामपंचायत सदस्य दिपक पवार,
प्रकाश धुमाळ, सुप्रिया धुमाळ, शिवा साठे, सागर पठारे आदी उपस्थित होते.
टाकळीभान— येथील गट नंबर २४५ व २५० मधील अनाधिकृत बांधकाम बंद करून शासनाची जागा शासनाने ताब्यात घ्यावी या मागणीसाठी
आप्पासाहेब रणनवरे यांनी उपोषण सुरू केले आहे.