राहुरी खुर्द च्या राजेश्वर मंदीराचा परिसर भक्तांच्या मांदीयाळीने फूलून गेल्याचे चित्र

महाशिवरात्री दिनी राहुरी खुर्द च्या राजेश्वर मंदीराचा परिसर भक्तांच्या मांदीयाळीने फूलून गेल्याचे चित्र आज दिवसभरात दिसून आले,हर हर महादेव जय भोलेनाथ चा नारा परिसरात दणाणून गेल्याने वातावरण शिव भक्तांच्या भक्तीने शिवमय झाले.
गेले दोन वर्ष कोरोनाच्या सावटामुळे यात्रा रद्द करण्यात आलेल्या होत्या कोव्हीड नियमावली मुळे मंदीरे बंद होती भक्तगणांना देवालयांमधे प्रवेश निशिद्ध असल्याने देवालयांमधे तुरळक गर्दी दिसून येत होती यंदा मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव ओसरत असल्याने मंदीरे खुली करण्यात येवून भक्तांना दर्शनासाठी देवालयात भक्तीभावाने पूजाअर्चा करता आली.
राहुरी खुर्दचे ग्रामदैवत राजेश्वर जागृत देवस्थान पंचक्रोशीतील शिवभक्तांसाठी महादेवाचे येथील मंदीर भक्तीभावासाठी पर्वणीच महाशिवरात्रीला शिवभक्तांच्या गर्दीने फूलून जाते आज सकाळी कावड्यांनी तिर्थक्षेत्र पुणतांबा येथून आणलेल्या गंगाजलाने भगवान राजेश्वराला अभिषेक करण्यात येवून महाशिवरात्रीच्या पूजेस आरंभ होवून शिवभक्तांच्या दर्शन रांगेने मंदीर फूलुन गेले,
परिसरात बालगोपाळांसाठी खेळण्यापाळण्याची साधने तसेच फुलहार व प्रसादाच्या दूकानांनी राजेश्वराचा परिसर शिवमय झालेला दिसून आला.
राजेश्वर मंदीर येथे राजेश्वर ट्रस्टच्या सेवेकरी यांनी शिवभक्तांच्या सोयीसाठी अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या सकाळी अनेक सेवाभावी संघटना व शिवभक्त मंडळांनी खिचडी महाप्रसादाचे वाटप केले,
याप्रसंगी राहुरी खुर्दचे पोलिस पाटील इंजी.बबनराव अहिरे, देवस्थान कमेटीचे एकनाथ चोपडे,ग्रा.पं. सदस्य पोपट चोपडे, बाबासाहेब गुंड, आश्विनीताई कुमावत, बंडूभाऊ घोरपडे,राजू भांड,साईनाथ भिसे, खाचणे मामा,प्रकाश शितोळे,मारुती शेडगे, सोमनाथ गुंड,उद्वव पवार,भाऊ जाधव,दिपक जाधव, दादा शेटे,राम तोडमल,प्रविण मेहेत्रे, प्रशांत डोळस,बबलू पाटोळे यांनी उपस्थित दर्शवत मंदीर परिसरात शिवभक्तांना सुविधा देण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
मंदीर परिसरात दर्शन रांगेत व देवालय परिसरात शांतता नांदावी यासाठी राहुरीचे पोलिस निरिक्षक प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलास कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त दिला.