मुख्याध्यापक बाळासाहेब पोळ यांना मिळाली पदोन्नती

श्री बाळासाहेब गंगाधर पोळ सर यांची मुख्याध्यापक पदी पदोन्नती झाल्याने त्यांची बदली जि.प.प्रा.शाळा घोगरगाव ता. नेवासा येथे झाल्याने जि.प.प्रा.शाळा वांगी बु. शाळा , ग्रामस्थ, ग्रामपंचायत, पालक, विद्यार्थी यांच्या उपस्थिती मध्ये पोळ सरांना सपत्नीक सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांचे आभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी पोळ सरांचा मित्र परिवार माजी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाला जेष्ठ मार्गदर्शक श्री. जगन्नाथ बिडगर, सामाजिक कार्यकर्तेश्री धनंजय माने,माजी सरपंच श्री. बाबासाहेब येळे, सौ. आसराबाई बिडगर उपसरपंच सौ. गंगुबाई माने ,तंटामुक्ती अध्यक्ष श्री.विठ्ठल चितळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. भारत बिडगर, ग्राम सेविका श्रीम शितल बाचकर मॅडम , शाळा व्यवस्थापन सदस्य श्री विठ्ठल बिडगर, श्री. आसाराम पिसाळ, ग्रामस्थ श्री गजानन बिडगर, आशा सेविका अनिता आव्हाड, इब्टाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री विजय काटकर, जाधव वस्ती शाळेचे मुख्या. श्री. भागवत पौळ सर, वांगी खु. शाळेच्या शिक्षिका श्रीम. सुरेखा सुरडे मॅडम, खिर्डी शाळेचे मुख्या. श्री. अरुण ठाकरे, गुरुमाऊली प्रणित रोहोकले गट तालुका संघ अध्यक्ष श्री सुजित बनकर सर श्री. बाबासाहेब मतेसर श्री बाबाजी डुकरे सर श्री सुनिल बागुल सर श्री. प्रमोद सोनकांबळे सर कु. कोमल पोळ सर्व विधार्थी उपस्थित होते.