तेजस्विनी ज्योतिर्मय भारत याञेचे शनिशिंगणापुरात स्वागत.
सोनई–शनिशिंगणापुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेखालील “आजादी का अमृत महोत्सवा” निमित्त अहमदनगरचे खासदार डाॅ.सुजय विखे यांचे मिञ मध्यप्रदेश मधील गुणा मतदारसंघाचे खासदार कुष्णपालसिंह यादव यांच्या सुविघ पत्नी डाॅ.अनुराधा कुष्णपालसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शुभांगी मेंढे,मिनल भोसले,जया व्यास,प्रिती चोले,मंजुषा जोशी,वनिता शहा,प्रिती लेंडे,सारिका मोहोञा या आठ महिलांनी तेजोनिधी सेंटर फाॅर सोशल डेव्हलपमेंट या फाॅडेंशन संस्थे मार्फत भारत परिक्रमेचे आयोजन केले आहे.75 वर्षातील प्रगतशील भारतातील संस्कृती,बदल व प्रगतीचा इतिहासाचा आढावा घेण्याकरिता याञेचे स्वरूप असल्याचे या महिलांनी सांगितले.या आठ महिला शनिशिंगणापुरात स्वतः गाडी चालवत आल्या.”देखो अपना देश” या स्लोगनखाली भारत खोज याञा सुमारे तेरा राज्यातुन अकरा हजार किलोमिटर अंतर पार करतील.यात 9 ज्योर्तीलींग 7 प्रमुख नदीचा अभ्यास,नदी प्रदुषण व जलसंवर्धना बाबत ही तेजोनिधी महिला टिम जनजागृती करणार आहेत.केंद्रीय मंञी नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचनताई गडकरी यांच्या आशिर्वादाने मातृशक्ती संकल्पने नुसार भारतशक्ती व विश्वशांतीचा प्रचार प्रसार करणार असल्याचे या आठ महिला चमुने सांगितले.
शनैश्वर देवस्थानच्या वतीने उपाध्यक्ष विकास बानकर यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी पाथर्डी नगरपरिषदचे नगरसेवक प्रविण राजगुरू,छावाचे कार्याध्यक्ष संदिप दरंदले,सचिन तरटे,शकिल बागवान आदींनी भारतयाञेला शुभेच्छा दिल्या.
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.