राज्य मंत्री तनपुरे च्या हस्ते विविध विकास कामाचे भुमीपुजन

राज्य मंत्री तनपुरे च्या हस्ते विविध विकास कामाचे भुमीपुजन
राहुरी तालुका/ अशोक मंडलिक
राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे दि २९ १ २०२२ रोजी राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांचे हस्ते गावातर्गत रस्ते आणि इतर विवीध विकास कामाचे भूमीपुजन करण्यात आले यावेळी विद्यापीठाने संपादीत केलेल्या जमीनीवर अतीक्रमण करुण राहाणाऱ्या लोकांचा विचार केला पाहीजे असे मत मंत्री तनपुरे यांनी व्यक्त केले परंतु ज्या मागास वर्गीय लोकांनी आपल्या महार हाडोळे जमीनी विद्यापीठाला शिक्षण व संशोधनाला दिल्या त्या जमीनी चा वापर विद्यापीठाने केला नाही आज सहा गावचे प्रकल्प ग्रस्त शेतकरी आज भुमीहीन झाले आहेत विद्यापीठाच्या अतीरीक्त जमीनी वर दुसरेच अतिक्रमण करून राहत आहेत ‘ मंत्री महोदयांनी या प्रकल्पग्रस्तांचा ही विचार करावा अशी जमलेल्या ग्रामस्तां मध्ये दबक्या आवाजात चर्चा होताना दिसत होती यावेळी जि.प. सदस्य धनराज गाडे पं सं उपसभापती प्रदिपभाऊ पवार. डिग्रस गावचे सरपंच पोपटराव बर्डे. माजी पं सं सभापती रावसाहेब भिंगारदे. माजी सरपंच रावसाहेब पवार.मा पं स सदस्य सचिन भिंगारदे.केशव बेल्हेकर.शामानंदगिरी महाराज मा.उपसरपंच मधुकर पवार. संदिप कोकाटे. आदींसह ग्रामस्त उपस्थीत होते.