वाईनला खूलेआम परवानगी देणे चुकीचे निर्णय मागे घ्यावा आमदार राधाकृष्ण विखे पा.

वाईनला खूलेआम परवानगी देणे चुकीचे निर्णय मागे घ्यावा -आमदार राधाकृष्ण विखे पा.
शासनाने वाईन विक्रीला खूलेआम परवानगी दिली असुन यात फार मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे. हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी आमदार राधाकृष्ण विखे पा यांनी केली आहे आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे बेलापुर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बांधण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाच्या उद़्घाटनासाठी आले असता पत्रकारांनी वाईनला परवानगी या विषयावर छेडले असता आमदार राधाकृष्ण विखे पा. म्हणाले की वाईन व दारु ही शारिरीक दृष्ट्या योग्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगणे या सारखे दुर्दैव कोणते आहे .दारु असो की वाईन शेवटी ती शरिराला घातकच आहे तरी देखील या शासनाने किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यामागे काहीतरी गौडबंगाल असण्याची दाट शक्यता आहे या शासनाने लोकांच्या भावनेशी खेळण्याचा उद्योग सुरु केलेला आहे लोकांची श्रद्धास्थाने असणारी मंदीरे बंद करुन मदीरालये सुरु करण्याचा निर्णय घेतला असुन या सारखे दुर्दैव ते कोणते ?असा सवाल करुन आमदार विखे पा .म्हणाले की या अघाडी सरकारने कुणालाच न्याय दिलेला नाही .शेतकरी उद्योजक व्यवसायीक कोवीडमुळे बेरोजगार झालेले नागरीक यातील कुणालाच दिलासा देवू शकलेले नाही आता किराणा दुकानात वाईनला परवानगी देवुन काय साध्य केले केवळ संबधीतांशी हातमिळवणी करुन यात मोठा भ्रष्टाचार झाला असावा त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा अशी भाजपाची मागणी असल्याचेही आमदार राधाकृष्ण विखे पा .यांनी सांगितले
बेलापुर प्रतिनिधी –
देविदास देसाई