अपघात

लोहारवाडी मोरगव्हाण रस्त्यावर मृतदेह सापडला गुन्हा दाखल संशयितास अटक पाच दिवसांची पोलीस कोठडी

लोहारवाडी मोरगव्हाण रस्त्यावर मृतदेह सापडला गुन्हा दाखल संशयितास अटक पाच दिवसांची पोलीस कोठडी

 

 

नेवासा तालुक्यातील लोहार वाडी मोरगव्हाण रस्त्यावर ऊसाच्या शेतात मृतदेह मिळवून आल्याने व मयत व्यक्तीच्या भावाने सोन‌ई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित योगेश भालशकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच संशयितास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या बाबद पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि 15 रोजी दुपारी 3 वाजे दरम्यान हरिचद्र लोंढे हा घरातील माणसांना म्हणाला कि मी गावांतून चक्कर मारुन येतो असे सांगुन गेला तो परत आलाच नाही म्हणुन घरच्यांनी शोध घेतला पण तो मिळवून आला नाही शोध घेत असताना दि 16 रोजी दुपारी 5=15 सुमारास तो जख्मी अवस्थेत लोहारवाडी ते मोर गव्हाण जाणारर्या शिव रस्त्यालगत असलेल्या ऊसाच्या शेतात पडलेला आहे असे समजल्याने तातडीने त्यास नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले आसता येथील डॉ यांनी तपासणी केली असता त्यांनी मयत घोषीत केले फिर्यादीस घोडेगाव येथील लोकांकडून अशी माहिती मिळाली कि दि 15 रोजी संध्याकाळी तुझा भाऊ व त्याचा मित्र योगेश भालशकर हे दोघे एकत्र होते व एकाच गाडीवर फिरत होते असे समजल्याने मयताचा भाऊ हा योगेश भालशकर यांच्या कडे चौकशी करण्याकरिता गेलो असता तो घरी मिळवून आला नाही त्याचा लोंढे कुटुंबातील सदस्य यानी बरहानपुर घोडेगाव शिवारात शोध घेतला असता तो मिळवून आला नाहीं म्हणुन योगेश भालशकर याने हरिश्चंद्र पोपट लोंढे याला कोणत्यातरी गाडीवरुन मोर गव्हाण शिवारात नेहून कोणत्यातरी कारणास्तव कोणत्यातरी हत्याराने जबर मारहाण केल्याने त्या मारहाणीत माझ्या भावाचा मृत्यू झाला आहे असे फिर्यादीत म्हटले आहे त्यावरुन सोन‌ई पोलीस ठाण्यात ॢ302 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा अधिक तपास सोन‌ई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी हे करीत आहेत

1/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे