गुन्हेगारी

शनिशिंगणापूर परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

शनिशिंगणापूर परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

 

नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला.

 

दि. १ जुलै रोजी रात्री पोसई कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल श्री. पवार, अजय ठुबे यांचे पथक शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, त्यांनी खरवंडी शिवारात छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रोडवर विनानंबरचा लाल रंगाचा डंपर थांबवून पाहणी केली असता, सदर डंपरमध्ये वाळू मिळून आली. डंपर चालकास विचारपुस करण्याचा प्रयत्न केला असता तो डंपरच्या पाठीमागून पळून गेला. पळत असताना त्याचा मोबाईल त्याच्या खिशातून पडला, तो पोलिसांना मिळुन आला. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांना समजले असता ते आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी

 

सुमारे तीन ब्रास वाळू असलेला डंपर व आरोपीचा मोबाईल असा मुद्देमाल पोलीस ठाण्यात जमा केला. याप्रकरणी विनानंबरच्या डंपरवरील अनोळखी चालक व चालकास घेऊन जाणारा यांच्याविरुद्ध शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात बिएनएस चे कलम ३०३ (२), ३५२, १२६(२), २२१, ३ (५) प्रमाणे पर्यावरण कायदा अधिनियमचे कलम ३, १५ व गौण खनिज कायदा कलम ४, २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीकडून विनानंबरचा सोळा लाख रुपये किंमतीचा डंपर, त्यामध्ये अठरा हजार रुपये किंमतीची तीन ब्रास वाळू, एक दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल, एक पांढऱ्या रंगाची एमएच १४ इसी २१४० नंबरची पाच लाख रुपये किंमतीची कार असा एकूण एकविस लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा मुद्देमाल कारवाई जप्त करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी तीन तासांच्या आत अटक केली. सदरची कारवाई आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून पुढील तपास शनिशिंगणापूर पोलीस करीत आहे

5/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे