राहुरी अर्बन निधी संस्थेच्या कार्यालयाचे कुलपाचे कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी संस्थेत प्रवेश पुढे झाले असे काही ?

राहुरी अर्बन निधी संस्थेच्या कार्यालयाचे कुलपाचे कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी संस्थेत प्रवेश पुढे झाले असे काही ?
राहुरी तालुक्यातील मुळाडॅम फाटा येथिल दि राहुरी अर्बन निधी संस्थेच्या कार्यालयाचे कुलपाचे कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी संस्थेत प्रवेश केला परंतू चोरट्यांना संस्थेतील तिजोरी फुटलीच नाही.त्यामुळे चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. तालुक्यात सध्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असुन पोलिस गस्तीवर असतानाही चोरटे पोलिसांच्या नाकावर बसुन चोऱ्या करत आहे. आज एक ही चोरीचा तपास लागलेला नाही.
मुळाडॅम फाटा येथिल दि राहुरी अर्बन निधी संस्थेच्या कार्यालयाचे शटरचे कोयंडे तोडुन चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. गुरवारी राञी 12 वाजल्या पासुन चोरटे संस्थेच्या इमारती जवळील आंधारात दबा धरुन बसला राञी 1;30 वाजण्याच्या सुमारास याचोरट्यांच्या टोळीतील एक जण संस्थेच्या कार्यालया समोर येवून बाहेरच्या बाजुला असलेल्या ट्युब लाईट तोडून टाकल्या त्यानंतर सीसीटिव्ही कँमेरे फोडण्यात आले.हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कँमेऱ्यात कैद झाला आहे.संस्थे समोर अंधार झाल्या नंतर चोरट्यांनी संस्थेच्या शटरचे कोयंडे तोडले संस्थेत प्रवेश करुन कपाटाची उचका पाचक केली.परंतू हाथी काहीच लागले नाही.चोरट्यांनी संस्थेची तोजोरी फोडण्यासाठी भरपुर प्रयत्न केले.परंतू चोरट्यांनी तिजोरी फोडण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेत. परंतू चोरट्यांना तिजोरी फोडता न आल्याने रिकाम्या हाथी परतावे लागले. तिजोरी फुटली असती तर चोरट्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम मिळाली असती.
राहुरी तालुक्यात सध्या चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या वाढले आहे पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोऱ्या होत आहे.झालेल्या चोऱ्या पैकी एकाही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले नाही. गस्तीवरील पोलिस सायरन वाचत हिंडतात त्यामुळे चोरट्यांना पोलिसांचा इशारा मिळत असल्याने गस्तीवरील गाडी आली चोरटे अंधारात दबा धरुन बसतात.गस्ती वरील गाडी पुढे गेली काचोरटे पुन्हा चोरी करण्यासाठी सज्ज होतात. त्यामुळेच चोरटे पोलिसांच्या हाथाथ येत नाहो.
चोरीच्या ठिकाणी राहुरीचे पोलीस निरिक्षक प्रताप दराडे. सहाय्यक फौजदार. ब्रहाटे.पो. हे.का.वाल्मिक पारधी. पो. ना. सुशांत दिवटे. या पोलिसांनी भेट दिली उशिरा पर्यंथ पोलिस ठाण्यात कोणतीही फिर्याद दाखल झाली नाही.