हददपार आरोपीवर गुन्हा दाखल राहुरी पोलीस स्टेशन अहिल्यानगर यांची कारवाई.
आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने राकेश ओला , पोलीस अधीक्षक अहिल्यानगर ,अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर , उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी राहुरी पोनि/ संजय ठेंगे यांना पोलीस स्टेशन हददीतील तडीपार व गुन्हेंगारी पार्श्वभुमी असलेले आरोपी विरुदध कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
वरील आदेशाप्रमाणे पोनि संजय ठेंगे यांनी राहुरी पोलीस स्टेशन नेमनुकिचे, स. फौ. तुळशीदास गिते, पोहेकॉ. संदीप ठाणगे, पोहेकॉ. विकास वैराळ, पोहेकॉ/ सुरज गायकवाड , पोहेकॉ/ राहुल यादव , पोकॉ/ प्रमोद ढाकणे , पोकॉ/ नदिम शेख , पोकॉ/ सतिष कुऱ्हाडे ,पोकॉ/ अंकुश भोसले अशांचे पथक तयार करून राहुरी तालुक्यामधील हददपार इसम नामे भारत भाऊसाहेब ढोकणे यांस हददपार प्राधीकरण तथा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी दिनांक 05/06/2023 पासुन अहमदनगर जिल्हयातुन 18 महिन्यासाठी हददपार केले होते . सदर आरोपी बाबत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती मिळाली होती कि, हददपार इसम नाते भारत भाऊसाहेब ढोकणे हा विनापरवाना हददपार असताना राहुरी शहरातील त्याचे घरी आलेला आहे. त्या अनुषंगाने राहुरी पोलीस स्टेशनचे वरील पथक पाठवुन सदर आरोपींचा त्याचे राहते घरी शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्याचेवर मुंबई पोलीस अधिनियम 142 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
सदर कारवाई राकेश ओला ,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे , अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, व डॉ. बसवराज शिवपुंजे , उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.