मानोरी येथील रेणुका माता मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात

मानोरी येथील रेणुका माता मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात भाविकांच्या मांदियाळीत मंदिरात घटस्थापना
राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील मानोरी येथील जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवता अशी अख्यायिका असणाऱ्या तसेच ग्रामदैवत म्हणून नावलौकिक असणारी श्री रेणुका माता मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवात घटस्थापना करून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला सकाळी सात वाजता गावातील महिला भगिनी पुरुष व तसेच तरुणांनी घोगरगाव येथून गंगामाई चे कावडीने पवित्र पाणी आणून देवीच्या मूर्तीचा जला अभिषेक घातला त्यानंतर वस्त्र अलंकार फुलांची सजावट करून घटस्थापना करण्यात आली. गावात या उत्सवानिमित्त सर्व घरासमोर सडा रांगोळी काढण्यात आली त्याच बरोबर श्रीक्षेत्र माहूरगड ते श्रीक्षेत्र मानोरी पायी ज्योत आणण्यात आली असून सुमारे 50 हून अधिक तरुणांनी ज्योत आणण्यात सहभाग घेतला सुमारे पाचशे किलोमीटर ज्योत घेऊन पायी प्रवास करत श्रीक्षेत्र मानोरी येथे सुखरूप पोहोच झाले असे यावेळी तरुणांकडून सांगण्यात आले ज्योत सकाळी गावात आल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात तसेच डीजेच्या आवाजात तोफांची सलामी देत फटाक्यांच्या आतषबाजीसह भव्य दिव्य अशी मिरवणूक गावातून काढण्यात आली यावेळी देवस्थानचे विश्वस्त यांनी तरुणांची व कावड आणणाऱ्या महिला पुरुष तरुणांचे आभार मानले गावात या नवरात्र उत्सवामुळे आनंदी व भक्तिमय वातावरण तयार झाले सकाळी सामुदायिक आरती होऊन मंदिराचे प्रवेशद्वार खुले करण्यात आले गावचे पोलीस पाटील भाऊराव आढाव व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ रंजनाताई आढाव यांच्या उपस्थितीत मंदिराच्या गाभाऱ्यात देवी भक्तांच्या साक्षीने घटस्थापना करण्यात आली घटस्थापना झाल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी मोठी रीग लागली या नवरात्र उत्सवानिमित्त देवी मंदिरासह गावातील सर्वच मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली देवी मंदिरामध्ये दररोज पहाटे काकडा भजन सायंकाळी हरिपाठ दररोज सकाळी सात वाजता दुपारी बारा व सायंकाळी साडेसहा वाजता देवीची आरती भाविकांच्या हस्ते होणार आहे दररोज आरती संपल्यानंतर उपस्थित देवी भक्तांना भाविकांकडून दररोज दुपारी व सायंकाळी आरती संपल्यानंतर फराळ पंगत आयोजित केलेली आहे तरी यावर्षी जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री रेणुका माता भगवती संस्थान व सार्वजनिक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नानासाहेब गेनुजी पाटील आढाव यांनी केले आहे