राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या जयंतीचा राहुरी खुर्द ग्रामपंचायतीला पडला विसर.

*राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या जयंतीचा राहुरी खुर्द ग्रामपंचायतीला पडला विसर
राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी होत असताना मात्र राहुरी खुर्द ग्रामपंचायतला याचा सोयिस्कर विसर पडलेला दिसला. विशेष म्हणजे राहुरी खुर्दचे सरपंच व उपसरपंच व पोलीस पाटील हे आरक्षणातील असून ज्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. स्त्रीयांसाठी अपार कष्ट घेतले. त्याचाच फायदा घेवून शिक्षण घेतलेल्या सरपंचांनाच मात्र आरक्षणामुळे मिळालेल्या सरपंच पदावर विराजमान आहेत. आपल्या महामानवांचाच विसर ग्रामपंचायतला पडलेला दिसत आहे. त्याचप्रमाणे कार्यालयात कोणत्याही महापुरूषांचा फोटो नाही. महापुरूषांचे फोटो एका बॉक्समध्ये ठेवलेले असून ज्या-त्या वेळेस तो फोटो बाहेर काढून काम झाल्यावर पुन्हा बॉक्समध्ये बंद केले जातात. तेव्हा महापुरूषांचे फोटो कार्यालयात न लावल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भिम आर्मीचे जिल्हा संघटक मनोज शिरसाठ यांनी दिला आहे.
दरम्यान, ग्रामपंचातच्या या नतभ्रष्ट पुढार्यांमुळेच समाजाची वाताहात होत असल्याची चर्चा राहुरी खुर्द ग्रामस्थांमध्ये होत आहे.