महाराष्ट्र

महसूल विभागाच्या वतीने भटक्या विमुक्त जमाती आदिवासी समाजाच्या दाखल्यासाठी शिबिराचे आयोजन 

महसूल विभागाच्या वतीने भटक्या विमुक्त जमाती आदिवासी समाजाच्या दाखल्यासाठी शिबिराचे आयोजन 

 

टाकळीभान प्रतिनिधी : श्रीरामपूर महसुल विभागाच्या वतीने मंगळवार दि. ६ ऑगस्ट रोजी स.11 वा.तलाठी कार्यालय टाकळीभान या ठिकाणी भटक्या, विमुक्त व आदिवासी जमाती प्रवर्गातील नागरिकांच्या जातीच्या दाखल्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

   सदर प्रवर्गातील समाजाचे प्रमाण लक्षणीय असून, सततच्या भटकंतीमुळे या वर्गातील समाजाला शासकीय दस्तावेज व लाभ मिळवण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत सर्व भटक्या विमुक्त जमाती आदिवासी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले लवकर उपलब्ध व्हावे व ,त्यांच्या वेळेची बचत होऊन त्यांचे परिश्रम वाचावे म्हणून महसूल विभागाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला असून अनेक गरजूंनी शिबिराच्या ठिकाणी जातीच्या दाखल्यासाठी आपले अर्ज जमा केले व शिबिराचा लाभ घेतला,

    यावेळी शिबिराचे उद्घाटन मंडळ अधिकारी प्रशांत ओहोळ, यांच्या हस्ते करण्यात आले.

     याप्रसंगी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, तलाठी भडकवाल, तलाठी लचोरे, बाळासाहेब वायदंडे, अशोक चितळकर, ज्येष्ठ पत्रकार दिलीपराव लोखंडे, धनराज कोकणे ,मोहण रणनवरे कोतवाल सदाशिव रणनवरे, सहाय्यक संदीप जाधव, काकासाहेब रणनवरे, सेतू चालक प्रशांत थोरात, सुजित मोटकर,शिबिर लाभार्थी नागरिक उपस्थित होते.

5/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे