महाराष्ट्र

लव जिहाद या ज्वलंत सत्य घटनेवर आधारित “द केरला स्टोरी” हा चित्रपट तळागाळातील लोकांना बघता यावा म्हणून करमुक्त करावा म्हणून जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाला निवेदन

*पाच मे रोजी रिलीज होणारा लव जिहाद या ज्वलंत सत्य घटनेवर आधारित “द केरला स्टोरी” हा चित्रपट तळागाळातील लोकांना बघता यावा म्हणून करमुक्त करावा म्हणून जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाला निवेदन देऊन मागणी केली आहे.*

जिल्हाभर प्रशासनाला दिलेल्या निवेदनात हिंदुत्ववादी संघटनांनी म्हंटले आहे की,पाच मे रोजी प्रदर्शित होणारा “द केरला स्टोरी”या चित्रपटातील पात्र जरी काल्पनिक असले तरी केरळात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे.लव जिहादची पाळंमुळं भारतात इतकी खोलवर गेलेली आहे की त्याचा नायनाट करण्यासाठी लव जिहाद बाबतीत जनजागृती होणे गरजेचे आहे.ती जनजागृती चित्रपटाद्वारे सर्वोकृष्ठ अशीच होते.विपुल शहा निर्मित केलेला व सुदीप्त सेन यांनी दिग्दर्शित केलेला द केरळ स्टोरी हा चित्रपट हिंदू मुलींना लव जिहादच्या जाळ्यात अडकवून कशाप्रकारे फसवले जाते या ज्वलंत विषयावर व केरळमध्ये प्रत्यक्षात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे.समाजातील तळागाळापर्यंत या चित्रपटाचा संदेश जनतेपर्यंत गेला पाहिजे म्हणून हा चित्रपट शासनाने करमुक्त करावा जेणेकरून गोरगरीब जनतेत लव जिहाद बाबत जागरूकता निर्माण होऊन अल्पवयीन मुली लव जिहाद सारख्या खतरनाक प्रकारांपासून दूर राहतील. धर्मधर्मात तेढ निर्माण करणारा अनिष्ठ प्रकाराबाबत शासनाने अत्यन्त कडक कायदे बनवावेत जेणेकरून भविष्यात असे लव जिहाद सारखे विकृत प्रकार घडणार नाहीत व त्याचे बळी अल्पवयीन मुली जाणार नाहीत असेही निवेदनात म्हंटले आहे.

                       सदर चित्रपटावर बंदी घालावी म्हणून कांग्रेसने केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून पाच मे रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट सर्वांना बघता यावा म्हणून कोपरगाव येथील छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती,राहता येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसीलदारांना “दि केरला स्टोरी”या चित्रपटास शासनाने करमुक्त करावा म्हणून निवेदन दिले निवेदनावर प्रसाद निकम,किसन लोणारी,मनी गायकवाड, दिनेश खंडागळे, निलेश पवार, राहुल चवंडके,जय कदम,दत्तात्रय देसाई,यांचेसह असंख्य हिंदू धर्म प्रेमी यावेळी उपस्थित होते.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे