वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.रतन कचरू बनसोडे यांनी दिली नेवाशाला धावती भेट.

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.रतन कचरू बनसोडे यांनी दिली नेवाशाला धावती भेट.
*नाशिक पदवीधर मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.रतन कचरू बनसोडे यांनी दिली नेवाशाला धावती भेट.* आज दिनांक 23/0 1 /2023 रोजी सायंकाळी ६:३० वाजता नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माननीय रतन कचरू बनसोडे यांच्यासह राज्य उपाध्यक्ष, अहमदनगर उत्तरेचे जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कोळगे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष चरण भाऊ त्रिभुवन, गांगुर्डे साहेब,यांच्यासह पदाधिकारी यांनी घेतली नेवासा तालुका अध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण यांची भेट, यावेळी वंचित बहुजन आघाडी नेवासा तालुका अध्यक्ष हरीशदादा चक्रनानारायण, नेवासा तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब गव्हाणे, नेवासा तालुका संपर्कप्रमुख अंतोन भाऊ गोर्डे, नेवासा तालुका संघटक योगेशभाऊ बोर्डे, नेवासा तालुका सल्लागार सुनीलभाऊ मांडलिक, अँड. दिपक चक्रनारायण,यां सर्वांनी नेवासा शहरातील भगतसिंग चौक व इम्मानुयल चर्च परिसरात नाशिक पदवीधर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार मा.रतन कचरू बनसोडे यांचे फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत केले. यावेळी पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेवासा तालुका अध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार बनसोडे साहेब यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व चक्रनारायण वसाहत प्रभाग क्रमांक 2 नेवासा येथे आयोजित केलेल्या बैठकीमध्ये सर्वजन सहभागी झाले. यावेळी गांगुर्डे साहेबांनी पदवीधर मतदारांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच बुधवर कशाप्रकारे काम करायचे आहे मतदारांनी मतदान कसे करायचे आहे याविषयी योग्य ते मार्गदर्शन केले, अहमदनगर उत्तरेचे जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कोळगे यांनी नाशिक पदवीधर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रतनजी बनसोडे साहेब यांची ओळख करून दिली व त्यांना मोठ्या संख्येने पदवीधर मतदारांनी निवडून आणावे यासाठी आव्हान केले, यावेळी पदवीधर मतदार शिमोन चक्रनारायण, सुशील चक्रनारायण, सुभाष चक्रनारायण, प्रिया साळवे, सुगंधा चक्रनारायण, अँड. दीपक चक्रनारायण, योगेश बोर्डे, सुनील मांडलिक, अंतोन भाऊ गोर्डे, मुन्नाभाऊ शेख, तसेच सतीश चक्रनारायण, विशाल चक्रनारायण, योसेफ चक्रनारायण,अलोक चक्रनारायण, देवा चक्रनारायण, अनुष चक्रनारायण, येशूदास चक्रनारायण, रोहन चक्रनारायण, सुरेश चक्रनारायण, अतुल साळवे, गौरव साळवे, ईश्वरदास चक्रनारायण, सुधीर चक्रनारायण, अजय चक्रनारायण,अनिश सदाफळे,रोहीत शिनगारे,परेश चक्रनारायण,अभिषेक चक्रनारायण,आदी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी नाशिक पदवीधर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार माननीय रतनजी बनसोडे साहेब यांनी पदवीधर मतदारांनी आपल्याला मोठ्या संख्येने मतदान करून निवडून आणावे अशी विनंती केली जर मी निवडून आलो तर अहमदनगर जिल्ह्यातील सुशिक्षित पदवीधर बेरोजगारांना व्यवसायासाठी व नोकरीसाठी प्रामाणिकपणाने संधी उपलब्ध करीन,असे आश्वासन दिले.यावेळी नेवासा तालुका अध्यक्ष हरिश चक्रनारायण यांनी उपस्थितांचे आभार मानले.