सद्गुरु किसनगिरी बाबा पुण्यतिथी समितीची नेवासा देवगड येथे स्थापना.

सद्गुरु किसनगिरी बाबा पुण्यतिथी समितीची नेवासा देवगड येथे स्थापना.
संपूर्ण महाराष्ट्रातील भिल्ल समाजाचे आराध्य दैवत बाल संन्यासी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा श्री शेत्र देवगड तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी पुणे नाशिक औरंगाबाद अहमदनगर येथील किसनगिरी बाबा भक्त परिवाराच्या शेकडो परिवाराच्या उपस्थितीमध्ये जयंती समितीची स्थापना करण्यात आली भिल्ल समाजाचे अस्तित्व महाराष्ट्रामध्ये कुठेतरी निर्माण व्हावे या उद्देशाने प्रतिवर्षी बाबांच्या जन्मस्थळी गोदेगाव या ठिकाणी जयंतीचे आयोजन महाराष्ट्रातील स्वयंसेवकांच्या उपस्थितीमध्ये करण्याचे ठरले जयंतीच्या माध्यमातून बाबांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याच्या उद्देशाने सदर जयंतीचे नियोजन प्रतिवर्षी करण्याचे सर्वां नो मते पंच कमिटी ने मंजूर करण्यात आले.
अनेक स्वयंसेवकांनी आपापले विचार मांडून सदर बैठकीचा सारांश हा जयंतीचा मुख्य उद्देश ठरला सदर स्वयंसेवकांची बैठक नेवासाचे बर्डे सर विलासराव बर्डे संजय पवार रघुनाथ आहेर कुमार माळी यांनी केले होते स्वयंसेवकांमध्ये कैलास दादा माळी कृष्णाजी शोले आदिवासी प्रबोधन सेवा संघ संस्थापक ज्ञानेश्वर भानगड सतीश माळी रामभाऊ बर्डे सिन्नर नंदू मोरे पारनेर बाळू गांगुर्डे श्रीगोंदा अशोक माळी अकोले एकनाथ मोरे श्रीरामपूर अशा अनेक स्वयंसेवकांचे उपस्थितीमध्ये आनंदाच्या वातावरणात बैठकीचे आयोजन करण्यात आले.
सदर स्वयंसेवकाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ मार्गदर्शक लहू मोरे अवलगाव हे होते आलेल्या सर्व स्वयंसेवकांचे स्वागत आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष देविदास भाऊ पवार यांनी केले
आदिवासी एकता परिषद चे योगदान संपूर्ण देशभरातील जयंतीला राहील अशी हमी कैलास दादा माळी व संजय भाऊ गांगुर्डे यांनी दिली या वेळी मोठा आदिवासी समुदाय उपस्थित होता