राजकिय

माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचेसह देवळाली प्रवरा सोसायटीच्या २५३ सभासदांना नोटीस..! सोसायटी वर्तुळात खळबळ..

माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचेसह देवळाली प्रवरा सोसायटीच्या २५३ सभासदांना नोटीस..!
सोसायटी वर्तुळात खळबळ..

 

माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचेसह देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या २५३ सभासदांचे सभासदत्व रद्द करावे अशी मागणी संस्थेचे सभासद अरुण कोंडीराम ढुस, कारभारी बबनराव वाळुंज, रावसाहेब सोपान मुसमाडे आदींनी केल्याने सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, राहुरी यांनी चंद्रशेखर कदम यांचेसह त्या २५३ सभासदांना नोटीस देऊन अनुक्रमे दि. २१ फेब्रुवारी व दि. २४ फेब्रुवारी रोजी राहुरी येथे कागदपत्रांसह प्रत्यक्ष हजर राहून बाजू मांडणेसाठी नोटीस बजावली आहे.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, सध्या जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजत असून, वेगवेगळ्या टप्यातील निवडणूक कार्यक्रमानुसार सोसायट्याच्या मतदारयाद्या अंतिम करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सहकारी संस्था अधिनियम व उपविधीतील तरतुदीनुसार १० गुंठे व त्यापेक्षा कमी क्षेत्र किंवा अजिबात क्षेत्र नावावर नसलेल्या सभासदाला विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सभासद राहता येत नाही अशी तरतूद आहे. त्यानुसार देवळाली प्रवरा सोसाटीची मतदार यादी अंतिम करण्यापूर्वी अधिनियम व पोटनियमातील तरतुदीनुसार अरुण कोंडीराम ढुस व कारभारी बबन वाळुंज यांनी १९४ सभासदांना १० गुंठे व त्यापेक्षा कमी जमीन असल्याने व काहींना अजिबात जमीन नसल्याने त्यांचे सभासदत्व रद्द करण्यात यावे यासाठी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सहाय्यक निबंधक यांनी त्या १९४ सभासदांना सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ११ व २५ अ अन्वये नोटीस बजावून दि. २१/२/२०२२ रोजी दुपारी एक वाजता कागदपत्रांसह उपस्थित राहून बाजू मांडणेस कळविले आहे.
तसेच अधिनियम व पोटनियमातील तरतुदीनुसार एकाच कार्यक्षेत्रातील दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये सभासदाला सभासद राहता येत नाही. या तरतुदीनुसार देवळाली प्रवरा सोसायटी व बागायत पीक उत्पादक सोसायटी मध्ये दोनही ठिकाणी सभासद असलेल्या माजी आमदार चंद्रशेखर कदम व इतर ५८ अश्या ५९ सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यात यावे या मागणीसाठी रावसाहेब सोपान मुसमाडे व अरुण कोंडीराम ढुस यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून राहुरीचे सहाय्यक निबंधक यांनी सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ११ व २५ अ अन्वये नोटीस बजावून दि. २४/२/२०२२ रोजी दुपारी दीड वाजता आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे. उपस्थित न राहिल्यास आपले काही म्हणणे नाही असे समजून सभासदत्व रद्द करण्याची पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी नोटीस बजावली आहे.
अश्या पद्धतीने राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचेसह २५३ सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याबाबद नोटिसा निघालेने देवळाली प्रवरा सोसायटी सभासद वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रशेखर कदम यांचे सह ते ५९ सभासद जर देवळाली सोसायटी व बागायत पीक सोसायटी या दोनही सोसायटी मध्ये सभासद राहू इश्चित असतील तर विरोधी गटातील देवळाली सोसाटीचे जवळपास २५० सभासद बागायत पीक सोसायटी मध्ये सभासद होणेसाठी अर्ज दाखल करून चंद्रशेखर कदम गटाला शह देणार असल्याचे समजते.
सध्या देवळाली प्रवरा सोसायटी ही चंद्रशेखर कदम गटाकडे असून सभासद यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच स्वतः चंद्रशेखर कदम यांचेसह २५३ सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यासाठी मुदतीत तक्रार दाखल करून विरोधी गटाने आघाडी घेतल्याचे बोलले जात आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे