ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था वतीने पहिले राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन कार्यक्रमाचे आयोजन

ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था वतीने पहिले राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन कार्यक्रमाचे आयोजन
ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभान यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम, साहित्य संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते, यावेळी संस्थेच्या वतीने पहिले राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून या एक दिवसीय संमेलन कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट मराठी अध्यापन, व मराठी साहित्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन व साहित्य सेवा कार्य गौरव पुरस्कार सन 2023 ने गौरवण्यात येणार आहे. तरी या पुरस्कार साठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. तरी आपले प्रस्ताव 25 डिसेंबर 2022 पर्यंत श्री अर्जुन बी. राऊत संस्थापक अध्यक्ष ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभान, तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या पत्त्यावर किंवा 8379810018, 9881708445 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावेत अशी विनंती संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे