*संत शिरोमणी माऊलींच्या रथोत्सवाने आळंदीकर मंत्रमुग्ध. विठू नामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा*

*संत शिरोमणी माऊलींच्या रथोत्सवाने आळंदीकर मंत्रमुग्ध. विठू नामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा*
प्रतिनिधी आरिफ भाई शेख
आळंदी दि 21. श्री तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथील ज्ञानेश्वर माऊलींच्या रथ उत्सवाने आळंदीकर मंत्रमुग्ध झाले.
!! चला आळंदीला जाऊ !! !!ज्ञानदेव डोळा पाहू !! असे म्हणत लाखो भाविक अलंकापुरी मध्ये दाखल झाले होते, आज कार्तिकी द्वादशी ला रात्री माऊलींची पालखी प्रदक्षिणेला निघते, सालाबाद प्रमाणे आळंदीच्या गोपाळपुरा येथून निघते,माऊलींच्या फुल सजावट केलेल्या आकर्षक सजावटीने भाविकांचे डोळ्याचे पारणे फेटले, माऊलींच्या आकर्षक फुलांच्या सजावटीने भरलेल्या रथातून आणि सनई चौघडा च्या मनमोहक निनादात ,विठू माऊलीचा गजर करत, रथ उत्सव प्रदक्षिणा मार्गे निघाला, चाकण चौक, भैरवनाथ चौक ,लक्ष्मी माता चौक, विठ्ठल रुक्मिणी चौक,आणि महाद्वार अशी नगर प्रदक्षिणा करत ,माऊलींची भव्य मिरवणूक आज आळंदीकर आणि वारकरी भाविकांनी माऊली माऊली जयघोषात अनुभवली, तुळशी वृंदावन, विणेकरी , आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये वारकरी आणि विठ्ठल नामाचा घोष या उत्सवाला मनमोहक स्वरूप प्राप्त करून देत होता,माऊलींच्या दर्शनाने पावन झालेले लाखो डोळे भावनिक होऊन या रथोत्सवात सामील झाले होते, महाद्वार चौकातून पालखीत माऊली पुन्हा समाधी मंदिरात विराजमान झाले, मंदिरातील देवस्थानचे वतीने दिंड्यांचे मानकरी, ग्रामस्थ यांचा सन्मान नारळ प्रसाद देऊन सालाबाद रीतीरीवजाप्रमाणे करण्यात आला,ग्रामस्थांनी खांद्यावर पालखी घेत माऊलींना रथामध्ये विराजमान करण्यासाठी गोपाळपुरा येथे नेले होते, त्यानंतरच हे दृश्य ,आकर्षक फुल सजावट ,माऊलींचा जयघोष, हरिनामाचा गजर ,टाळ मृदंगाचा निनाद, संपूर्ण वातावरण भक्तीमय करत होते,आळंदीच्या इंद्रायणी तीरावर लखलखत्या दिवांच्या साक्षीने आज ह्या रथोत्सवाला सांगता स्वरूप प्राप्त झाले. उद्या दिनांक 22 रोजी माऊलींचा समाधी दिन सोहळा पार पाडणार आहे ,त्यानंतर कार्तिक वारीची समाप्ती होईल, अन लाखो भाविक, वारकरी, दिंड्या, या आपापल्या निवासी
!!!विठ्ठल आवडी…. प्रेम भाव!!
विट्ठल नामाचारे टाहो!! प्रेम भाव!!
म्हणत रवाना होतील. रथ उत्सव पारंपरिक पद्धतीने पार पडावा यासाठी आळंदी आळंदी पोलीस यांनी प्रदक्षिणा मार्ग खुला राहावा यासाठी आज दिवसभरात विशेष दक्षता घेत काळजी घेतली होती, वारकरी भाविकांना तशा सूचना दिल्या होत्या ,आणि रथोत्सव शांततेत पार पाडावा यासाठी विशेष प्रयत्न करत आळंदी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता,