महाराष्ट्र

तिळापुर मध्ये अनोख्या पद्धतीने जल्लोषात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

तिळापुर मध्ये अनोख्या पद्धतीने जल्लोषात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी.

 

राहुरी तालुक्यातील तिळापुर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अनोख्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमेस पुष्पहार ज्येष्ठ नागरिक नामदेव गरदरे यांच्या हस्ते अर्पण करुन प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी त्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या धुरंधर राजकीय हिंदूधर्म रक्षक कशा पद्धतीने व किती संकटाचा सामना करत सर्व जनसामान्यांना बरोबर घेऊन जम्मू काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत 29 वर्ष राज्य केले याबद्दल माहिती दिली या सर्व कार्याला उजाळा देत मनोगत व्यक्त केले त्याच वेळेस माझे चेरमन हिरालाल जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले व सर्व तरुण पिढी नेत्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

 

 

संध्याकाळी सहा ते आठ राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर रात्री नऊ ते अकरा या वेळेत प्रसिद्ध व्याख्याते निलेश जी वडीतके व जैन शेख यांचे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचे व कार्याचे अंगावर शहारे उठण्या जोगे व्याख्यान पार पडले राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना व आठवणींना कार्याला उजाळा देत जयंती उत्सव पार पाडला या कार्यक्रमाला ग्रामसेवक अमूल यांचीही विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन अहिल्या ग्रुप च्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तिळापूर ग्रामस्थ उपस्थित असल्याने आनंद द्विगुणित करण्यात आला.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे