राहुरी खुर्द पोटनिवणूकीत विकास मंडळ सरशी

राहुरी खुर्द पोटनिवणूकीत विकास मंडळ सरशी
राहुरी तालुक्यातील आग्रगण्य समजल्या जाणाऱ्या राहुरी खुर्द वार्ड क्रं २ मध्ये झालेल्या चुरशीच्या पोट निवडणूकीत विकास मंडळाचे उमेदवार अमोल रमेश डोळस यांनी बाजी मारली असून या पोट निवणुकीसाठी अमोल डोळस यांनी विकास मंडळ यांच्या कडून अर्ज दाखल केला होता. व जनसेवा मंडाळाकडून दुर्गेश सुकलाल वाघ यांनी अर्ज दाखल केला होता. यावेळी एकुण मतदान ६९६ मतदान झाले यापैकी अमोल डोळस यांना ४०७ मत मिळाली व दुर्गेश वाघ यांना २७८ मते मिळाली तर आकरा मते नोटा चिन्हावर पडली अमोल डोळस हे ११९ मंतानी विजयी झाले. व राहुरी खुर्द येथे यापूर्वी जनसेवा मंडाळाकडे ७ तर विकास मंडाळाकडे ७ अशी संख्या बळ होते अमोल डोळस यांच्या विजयामुळे विकास मंडाळाकडे निर्विवाद बहुमत झाले आहे. त्यामुळे सरपंच पद हे विकास मंडाळाकडे च राहणार आसल्याचे निश्चित झाले आहे. या पोट निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार सोहब होते तसेच मतदान अधिकारी कर्मचारी ग्रा पं कर्मचारी व ग्रामसेवक सभांजी निमसे व गाव कामगार पोलीस पाटील बबनराव अहिरे राहुरी खुर्द यांनी कामगिरी बजावली तर पोलीस निरिक्षक दराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पो कर्मचारी आव्हाड व इतरानी चोख बदोंबस्त ठेवला सदरची पोटनिडणूक शांतामय वातावरणात पार पडली.
राहुरी खुर्द जनसेवा मंडाळाच्या अंतर्गत धुसफुसी मुळे व गद्दारान मुळे विरोधी उमेदवार विजयी.पार्टीतील गद्दाराना धडा शिकवणार
रहुरी खुर्द जनसेवा मंडळ अध्यक्ष = पप्पूशेठ मालपाणी