पत्रकार प्रसाद मैड यांना मुंबई येथील हिंदुस्तान प्रकाशन संस्थेच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन्मान.
पत्रकार प्रसाद मैड यांना मुंबई येथील हिंदुस्तान प्रकाशन संस्थेच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन्मान.
राहुरी येथील पत्रकार प्रसाद मैड यांना मुंबई येथील हिंदुस्तान प्रकाशन संस्थेच्या विवेक समूहाचे वतीने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नाशिक येथील एका कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक पैठणी देऊन सन्मान करण्यात आला .
नाशिक रोड येथील आर्टिलरी सेंटर रोडवरील माहेश्वरी भवनच्या सभागृहात समारंभ संपन्न झाला . प्रसिद्ध साहित्यिक व अभिनेत्री तथा झी मराठी वरील तेव्हा तू तशी या मालिकेतील अभिनेत्री रमाताई नाडगौडा यांच्या हस्ते नाशिक येथे पैठणी देऊन सन्मान करण्यात आला . हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे विवेक समुहाचे राज्यात विविध 22 साहित्यिक , सामाजिक आणि कलाविषयक अशा संस्था व सामाजिक काम सुरू आहे . याच संस्थेचे साप्ताहिक विवेक हे राष्ट्रीय विचाराचे प्रकाशन असून प्रसाद मैड हे राहुरी विभागाचे प्रतिनिधी आहेत . यावेळी विवेक समूहाच्या सह प्रमुख अश्विनी मयेकर , मुंबई , पश्चिम महाराष्ट्र अधिकारी संजय शिवगण तसेच राज्यातील वीस जिल्ह्यातील विवेक समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते .