संपादक विजयराज बंब यांचा विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा*

*गेवराईत संपादक विजयराज बंब यांचा विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा*
—————————————–
सामाजिक उपक्रम; विजयराज बंब यांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह खाऊचे वाटप*
समाजरत्न तथा दैनिक लोकाशाचे संपादक मा.श्री.विजयराजजी बंब साहेब यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त गेवराई येथील कै.भगवानराव ढोबळे मूकबधिर व मतिमंद निवासी विद्यालयात गुरुवार दि.२ फेब्रुवारी रोजी सकाळी दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह खाऊचे वाटप करण्यात आले. तर उमापूर येथे भव्य रक्तदान शिबीरासह विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक लोकाशाचे संपादक सत्कारमुर्ती विजयराजजी बंब, निवासी संपादक उत्तमभाऊ हजारे, वृत्त संपादक भागवतजी तावरे, उपसंपादक अभिजीतजी नखाते, रासप जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे, दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे, सचिव सुनिल मुंढे दैनिक लोकाशाचे तालुका प्रतिनिधी विनोद पौळ, तलवाडा प्रतिनिधी तुळशीराम वाघमारे, राक्षसभुवन प्रतिनिधी राजेंद्र नाटकर यांच्यासह दिव्यांग शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पत्रकार बांधवांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप*
दैनिक लोकाशाचे संपादक विजयराज बंब यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठलसाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, सुशी यांच्या पुढाकारातून उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी वै.अधिक्षक डॉ.राजेश शिंदे, गेवराई ता.पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, म.रा.मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अंकुश आतकरे, ज्येष्ठ पत्रकार शिवाजी मामा ढाकणे, काझी अमान, संपादक अमोल वैद्य, पत्रकार प्रदीप जोशी, भागवत जाधव, वैजनाथ जाधव, व्हाईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष विनोद पौळ,म.रा पत्रकार संघाचे अध्यक्ष बापूसाहेब हुबंरे, अशोक जाधव, अमोल आरड, बाबा चोपडे, अंकुश लाटे, युसूफ मोमीन यांच्यासह आदी पत्रकार बांधव व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.