देश-विदेश
हिंदी भाषा ही देशाची प्रतिनिधित्व करणारी भाषा… प्रो डॉ. सदानंद भोसले…

हिंदी भाषा ही देशाची प्रतिनिधित्व करणारी भाषा… प्रो डॉ. सदानंद भोसले…
हिंदी भाषा ही देशाचे प्रतिनिधित्व करणारी असून , या साध्या सुमधुर भाषणे पूर्ण देशाला जोडून ठेवले असून आपल्या देशाच्या विविधतेतून एकतेचे दर्शन या भाषेने दिले आहे असे मत प्रो.डॉ सदानंद भोसले यांनी संमेलन प्रसंगी व्यक्त केले. टाकळीभान येथील रुक्मिणी माधव मंगल कार्यालयात ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचे पहिले राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन आणि उत्कृष्ट हिंदी अध्यापन सेवाकार्य पुरस्कार 2022 हा सोहळा पार पडला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे हिंदी भाषा चे अध्यक्ष प्रो. डॉ. सदानंद भोसले होते. . हे राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन अनेक मान्यवंरांच्या उपस्थितीत संपन्न झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आयोजक श अर्जुन राऊत यांनी दिली.
दिवसभर चाललेल्या या हिंदी संमेलनाचे उदघाट्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील हिंदी विभागप्रमुख कवी आलोचक प्रो. डॉ. सदानंद भोसले यांचे हस्ते झाले. श्रीसरस्वतीप्रतिमापूजन आणि दीपप्रजवलन करून हे उदघाट्न श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, उत्तरप्रदेश प्रयागराजचे, विश्व हिंदी साहित्यसेवा संस्थान अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ.शहाबुद्दीन शेख, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठाचे हिंदी अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.यादवराव धुमाळ, अध्यापक संघ, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन अध्यक्ष प्रा.डॉ.मिलिंद कांबळे, कविवर्य प्रा.पोपटराव पटारे, ह.भ.प.दत्तात्रय बहिरट महाराज, पुणे येथील बालभारतीचे सदस्य, प्रा.सुधाकर शिंदे, पेन रायगड येथील भा.नेने महाविद्यालयाचे हिंदी विभाग अध्यक्ष डॉ.देविदास बामणे , शिंदे सर,इत्यादींसह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी हिंदी अध्यापकांना उत्कृष्ट हिंदी अध्यापन सेवाकार्य पुरस्कार सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, साईशिर्डी डायरी,लाडू प्रसाद पॉकेट, साई कॅलेंडर,पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला.श्री साई संस्थानच्या विश्वस्त, श्रीरामपूर नगरपरिषदेच्या माजी अध्यक्ष अनुराधाताई आदिक यांनी साईडायरी, कॅलेंडर, प्रसादपॉकेट सर्वांना भेट म्हणून दिले.त्याबद्दल आयोजक अर्जुन राऊत यांनी विशेष कौतुक करून आभार मानले.
उदघाटनपर भाषणात प्रो.डॉ.सदानंद भोसले म्हणाले,अर्जुन राऊत यांनी टाकळीभानसारख्या छोट्या खेड्यात राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन आयोजित केले ही ऐतिहासीक आणि गावाच्या दृष्टीने भूषणावह बाब आहे.हिंदी भाषा ही जन -जन के हृदय की भाषा असून या भाषेत भारतीय सभ्यता, संस्कार, शिक्षा, न्याय, नीती मूल्यांचे भरणपोषण करणारी ही भाषा आहे.भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात या भाषेचे अमूल्य योगदान आहे, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करीत असताना हे राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन आयोजित करून ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थने इतिहास घडविला आहे.शासकीय पातळीवर यासाठी मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग संस्थेला करता येईल असे डॉ.भोसले यांनी सांगून साहित्यनिर्मितीचा सविस्तर आढावा घेतला.
सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे यांनी भाषा आणि समाज यांचे महत्व सांगून मराठी ही आपली आई असून हिंदी भाषा ही मावशी आहे, तिचे प्रेम जपले पाहिजे असे सांगून अर्जुन राऊत यांच्या धाडशी उपक्रमांचे कौतुक केले.डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी ‘ज्ञानज्योतीचा प्रकाश ‘ही कविता सादर करून अर्जुन राऊत हे ‘ज्ञानज्योती ‘शब्द शोधण्यासाठी दोन, तीन महिने शब्दकोश, शब्दरत्नाकर चाळत होते, त्यांना हाच शब्द योग्य वाटला, ज्ञानदीप जगी लावणारे शिक्षक ह्या खऱ्या ज्ञानज्योती आहेत, हा त्यांच्या उद्दात्त हेतू महत्वाचा असून ज्ञानज्योतीचे हे उदघाट्न व पहिले संमेलन सर्वांच्या सहकार्याने संपन्न झाले. कार्यक्रम प्रसंगी गायक दिपक वाघ यांनी देशभक्तीपर सुंदर गीत सादर केले तदनंतर स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देश सेवा देणारे मेजर संभाजी आघाडे,मेजर भिमराज कांबळे, मेजर पोपटराव दाभाडे,मेजर प्रतापराव मगर, यांचा देश सेवेबद्दल सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या उत्कृष्ट कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत, भैया पठाण,मुकुंद हापसे, अक्षय कोकणे, सागर पवार, रामेश्वर शिंदे ,संजय वाघमारे, प्रा.विजय बोर्डे इत्यादींचे मान्यवरांनी कौतुक केले.प्राचार्य डॉ.शहाबुद्दीन शेख यांनी हिंदी भाषा आणि साहित्यनिर्मितीचा अनुबंध सांगितला.ह.भ.प.दत्तात्रय बहिरट महाराज यांनी संत तुकाराम, संत कबीर,संत मीराबाई, संत ज्ञानेश्वर इत्यादींचे महत्व व भाषावैभव सांगून ज्ञानज्योत सदैव तेवत राहो ह्या सदिच्छा व्यक्त केल्या.अर्जुन राऊत यांनी स्वागत करून मान्यवरांचा सत्कार केला.प्रा.विजय बोर्डे यांनी प्रास्ताविक केले.तर या यशस्वी संमेलनाचे सूत्रसंचालन प्रियंका चाबुकस्वार व प्रा. संजय पवार यांनी केले.यावेळी अकोले येथील अगस्ती महाविद्यालयातील डॉ. साहेबराव सुकदेव गायकवाड यांच्या ‘हिंदी नाटक :एक समीक्षा ‘या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्तें प्रकाशन करण्यात आले.अर्जुन राऊत यांनी लेखकाचा सत्कार केला. डॉ. साहेबराव गायकवाड, सुधाकर शिंदे, डॉ.देविदास बामणे आदिंनी आपले मनोगतं व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी राजेंद्र कोकणे, प्रल्हाद कापसे, शिवाजी वखरे, पत्रकार बापूसाहेब कोकणे, पत्रकार दिलीपराव लोखंडे,विकास मगर , पत्रकार अशोक रणनवरे आदींसह हिंदी साहित्यिक प्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.मुकुंद हापसे यांनी आभार मानले.या संमेलन प्रसंगी भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, अनिल भनगडे यांनी भेट दिली त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला…
Rate this post