आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजन

आ. रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिरात विक्रमी रुग्णांची मोफत तपासणी करून मोफत चष्म्यांचे वाटप*

*आ. रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिरात विक्रमी रुग्णांची मोफत तपासणी करून मोफत चष्म्यांचे वाटप*

 

*वाड्या-वस्त्यांवर जाऊन प्रतिकूल परिस्थितीत डॉक्टरांनी केली वृध्द रुग्णांची तपासणी* 

 

 कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून कर्जत व जामखेड तालुक्यातील डोळ्यांच्या विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन १२ ते १७ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व ६ दिवसांच्या कालावधीत विक्रमी ३५ हजार रुग्णांची नेत्र तपासणी या शिबिरादरम्यान करण्यात आली. 

 

हे नेत्र तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ.डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज, पुणे व्हिजन कॅटॅलिस्ट फंड, जतन फाऊंडेशन, रिस्टोरिंग व्हिजन, एस्सीलोर व बारामती ॲग्रो या संस्थांचे सहकार्य मिळाले. तसेच रुग्णांची तपासणी करत असताना वृद्ध, शारीरिकदृष्ट्या व्यंग अथवा विविध कारणांनी जे रुग्ण शिबिराच्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशा रुग्णांची तपासणी वाड्या-वस्त्यांवर भर पावसात प्रतिकूल परिस्थितीतही जाऊन डॉक्टरांनी केली व त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार करून गरज असलेल्या रुग्णांना चष्म्याचे वाटप केले. 

 

कर्जत व जामखेड तालुक्यात आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिरादरम्यान एकूण ३५ हजार रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली असून एकूण २० हजार नागरिकांना इम्पोर्टेड क्वालिटीचे चष्मे पूर्णपणे मोफत देण्यात आले आहेत. सामाजिक बांधिलकीतून अशा प्रकारचे विविध शिबिरे कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी आयोजित केले जातात व नागरिकांच्या सोयीसाठी आमदार रोहित पवार आणि त्यांची संस्था कायमच पुढाकार घेत काम करत असते.

 

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत जामखेड तालुक्यातील नेत्र रुग्णांसाठी प्रत्येक गावात डोळ्यांचे शिबीर भरविण्यात आले असून या शिबिरात रुग्णांची डोळे तपासणी करून वीस  रुग्णांना इंपोर्टेड कंपनीचे चष्मे प्रत्येकी एक हजार रुपये किमतीचा असे वीस हजार रुपये किमतीचे चष्मे रुग्णांना मोफत देण्यात आल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे