युनियन बँक ऑफ इंडिया च्या वतीने शेतीसाठी गोल्ड लोन सुविधा.

युनियन बँक ऑफ इंडिया च्या वतीने शेतीसाठी गोल्ड लोन सुविधा.
सोनई,गणेशवाडी सध्या स्पर्धा युग, त्यातच कोरोना सारख्या आजाराने अनेकांचे रोजगार गेले, शेती मालाला योग्य बाजार भाव नाही. या ना अनेक समस्यांना सध्या अनेकांना तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी लागणारी आर्थिक अडचण अनेकांना भेडसावत असते. सध्या खाजगी सावकार शेतकऱ्यांची फसवणूक व खाजगी पतसंस्था यांचे अवाढव्य व्याजदर शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याने युनियन बँक चे वतीने शेतीसाठी गोल्ड लोन सुविधा सुरू करण्यात आली. शेतीसाठी लागणारे दर हे ७.२५,बिगर शेती ९.२५ ही सर्व फेड बारा महिने करीत असल्याचे सांगण्यात आले. या साठी आपले संबंधित शाखेत खाते असणे गरजेचे आहे. पॅन कार्ड, सात बारा, आठ अ फोटो, प्रत गरजेचे असल्याचे बॅक शाखाधिकारी प्रशांत कल्हापुरे यांनी सांगितले. यावेळी क्रुषी अधिकारी, अमोल चेपटे, सोनाली शेटे, विश्वास केकाण , अमिता शिंदे, रविंद्र ढगे, अशोक खोसे , मेजर अशोक रायभान, भारत पालवे, भिमा पालवे, रविंद्र लोळगे .