आळंदी शहर पक्ष कार्यालय च्या जवळ तुळजाभवानी मंदीर पटांगणात अजितपवार यांच्या वाढदिवसा निमीत्त विविध कार्यक्रम*

*आळंदी शहर पक्ष कार्यालय च्या जवळ तुळजाभवानी मंदीर पटांगणात अजितपवार यांच्या वाढदिवसा निमीत्त विविध कार्यक्रम*
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधान सभेचे विरोधी पक्षनेते नामदार अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी शहरात भव्य रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे शुभारंभ जेष्ठ नेते माजी लोक नियुक्त नगराध्यक्ष बबन राव कुऱ्हाडे पाटिल यांचे शुभ हस्ते करण्यात आला यावेळी प्रदेश प्रतिनिधी डी.डी.भोसले पाटील, माजी नगरसेवक प्रकाश शेठ कुऱ्हाडे आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते तसेच हा कार्यक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नवनिर्वाचित खेड तालुका उपाध्यक्ष श्री रोहन कुऱ्हाडे व आळंदी युवक अध्यक्ष सौरभ गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला व या वेळी नेत्र शिबिराला 250 लोकांनी व रक्तदान शिबिराला 75 लोकांनी सहभाग नोंदवला, मोफत नेत्र तपासणी करत नाम माञ शुल्क आकारणी ने चष्मे वाटप करण्यात आले. एक हेल्मेट गिफ्ट म्हणुन राष्ट्रवादीचा लोबो असलेली प्रत्येक रक्तदात्यास वाटण्यात आली,
यावेळी रोहन कुऱ्हाडे यांनी आळंदी शहरातील नागरिकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की मागील काळात देखील आम्ही अनेक सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले आहेत आता पक्षाने आम्हाला मोठी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीचे भान लक्षात घेता अजून मोठ्या उत्साहाने असे विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करू आणि राष्ट्रवादी चे पक्ष संघटन तळागळातपोहवणार आणि माजी पक्ष कार्यकर्ते यांना विश्वासात घेत त्यांनाही मूळ प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे करत राहील असा आशावाद व्यक्त केला आहे