गुन्हेगारी
मराठवाड्यातील”त्या” पुरूष व महिला महाराजांचे कृत्य सांप्रादायाला काळीमा फासणारे- ह. भ. प. संगीताताई शेजुळ

मराठवाड्यातील”त्या” पुरूष व महिला महाराजांचे कृत्य सांप्रादायाला काळीमा फासणारे- ह. भ. प. संगीताताई शेजुळ
मराठवाड्यातील वैजापूर तालुक्यातील ह.भ.प असणार्या एका नामांकीत महाराजांचा एका महिला किर्तनकाराबरोबरचा अश्लील व्हिडीओ सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. अशा एका धार्मिक क्षेत्रातील महाराजाकडून अशा स्वरूपाचे कृत्य घडले असेल तर ते अंत्यत चुकीचे व निंदनीय आहे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी असल्याचे मत टाकळीभान येथील किर्तनकार ह.भ.प.संगीताताई शेजूळ महाराज यांनी नूकतेच मांडले आहे.
पुढे बोलताने शेजूळ महाराज म्हणाल्या की, आपल्या वारकरी साप्रंदाया मध्ये अनेक महाराज मंडळी व महिला किर्तनकार आहे. आपणा सर्वांकडून भगवंताची सेवा घडली पाहीजे. कुठलेही वाईट कृत्य आपल्या हातातून घडू नये. आत्ताच मराठवाड्यातील एका पुरूष महाराज व महिला महाराजाकडून जे काही वाईट कृत्य घडले त्या महाराजांना समाजाने बाहेर टाकले पाहीजे. वारकरी सांप्रादायाने सुध्दा त्यांच्यावर बहिष्कार टाकला पाहीजे. अशा लोकांपासून वारकरी सांप्रादायाला गालबोट लागत आहे. त्यामुळे त्यांच्यापासून अलिप्त राहणे कधीही चांगले. मोठमोठ्या पदव्या मिळविलेले नामांकीत किर्तनकार अशा प्रकारचे वाईट कृत्य करीत असतील तर त्यांना त्या पदवीचा काहीच अधिकार नसल्याचे ह.भ.प.संगीताताई शेजूळ महाराज ,व ह भ प मुरलीधर दर्यापूरकर यांनी यावेळी सांगून झाल्या प्रकाराबद्दल निषेध व्यक्त केली.
Rate this post